ठळक मुद्देनयनतारा व प्रभूदेवा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा प्रभूदेवा विवाहित होता. तीन मुलांचा बाप होता. पण प्रेम आंधळे असते, त्यानुसार पत्नी व मुलांना सोडून प्रभूदेवा नयनतारासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला.

प्रभु देवा हे इंडियन फिल्म आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. पर्सनल लाईफबद्दल बोलायचे तर प्रभु देवाचे आयुष्य अनेक चढऊतारांनी भरलेले आहे. एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी, असे त्याचे आयुष्य आहे. कोरिओग्राफर, डायरेक्टर, अ‍ॅक्टर असलेला हाच प्रभु देवा वयाच्या 47 व्या वर्षी आपल्याच भाचीशी लग्न करणार, अशा चर्चा अलीकडे होत्या. पण तूर्तास ही चर्चा म्हणजे नुसती अफवा आहे. होय, कारण प्रभु देवाचे लग्न होणार नाही तर ते झालेय. होय, भाचीसोबत नाही तर  एका फिजिओथेरपिस्टसोबत प्रभु देवाने गेल्या सप्टेंबरमध्येच गुपचूप लग्नगाठ बांधल्याचे कळतेय.  

अशी झाली पहिली भेट
इंडियाटुडेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभुदेवाने गेल्या सप्टेंबरमध्येच फिजिओथेरपिस्टशी गुपचूप लग्न केले. मुंबईतील प्रभुदेवाच्या घरी हे लग्न झाले. सध्या प्रभु व त्याची ही फिजिओथेरपिस्ट पत्नी चेन्नईतल्या घरी राहत आहेत. प्रभुदेवाने लग्नाची बातमी इतक्या महिने मुद्दाम दडवून ठेवली. त्याच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभुदेवाच्या पाठीला मध्यंतरी दुखापत झाली होती. तेव्हा तो या फिजिओथेरपिस्टकडे उपचार घेत होता. याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर काही काळ दोघांनी एकमेकांना डेट केले. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नही केले.
गेल्या आठवड्यात प्रभु देवा त्याच्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, अशी चर्चा होती. सूत्रांनी मात्र या सगळ्या अफवा ठरवल्या. या सगळ्या  अफवा आहेत. प्रभु देवाने एका फिजिओथेरपिस्टशी लग्न केलेय आणि ती त्याची भाची नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. अर्थात प्रभु देवा वा त्याच्या मॅनेजरने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

प्रभु देवाने 1995 साली रामलतासोबत पहिले लग्न केले होते. रामलतापासून त्याला 3 मुले झालीत. 2008 मध्ये प्रभुच्या मोठ्या मुलाचे कॅन्सरने निधन झाले होते. 2011 मध्ये प्रभुदेवाने पत्नी रामलतापासून घटस्फोट घेतला होता. अभिनेत्री नयनतारासाठी त्याने पत्नीला सोडले होते. प्रभुदेवा व नयनताराचे अफेअर चांगलेच गाजले होते. अगदी पत्नीने उपोषणावर बसण्याची धमकी दिली होती.

कधी प्रभुदेवावर भाळली होती नयनतारा आता विग्नेशच्या प्रेमात झालीय वेडी, पाहा Romantic फोटो

नयनतारा व प्रभूदेवा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा प्रभु देवा विवाहित होता. तीन मुलांचा बाप होता. पण प्रेम आंधळे असते, त्यानुसार पत्नी व मुलांना सोडून प्रभु देवा नयनतारासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला. प्रभु देवाची पत्नी लताला ही गोष्ट कळली आणि तिने थेट फॅमिली कोर्टात धाव घेतली. नयनताराने माझ्या पतीशी लग्न केले तर मी उपोषणावर बसेल, अशी धमकीही लताने दिली. या प्रकरणाचा इतका बोभाटा झाला की, रस्त्यावर नयनताराचे पुतळे जाळले गेलेत. यातून सहीसलामत सुटण्यासाठी  आमच्यात असे काहीही नाही, असे  नयनताराने  अगदी शिरजोरपणे सांगितले होते. पण प्रभु देवापासून दूर राहणे नयनताराला शक्य नव्हते.  प्रभु देवासोबत लग्न करण्यासाठी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्मही स्विकारला होता. 

 अखेर नयनतारासाठी प्रभु देवाने एक मोठा निर्णय घेतला. पत्नीसोबतचे १६ वर्षांचे नाते तोडत २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला. यापोटी प्रभु देवाला   १० लाख रूपये, शिवाय २० ते २५ कोटींची प्रॉपर्टी शिवाय दोन कार असे सगळे पत्नीला द्यावे लागले. यामुळे नयनताराचे प्रेम आपल्याला मिळेल, असा त्याचा अंदाज होता. पण त्याचा हा अंदाज फसला. जिच्याशी लग्न करण्यासाठी प्रभु देवाने पत्नीला सोडले त्या नयनताराने २०१२ मध्ये प्रभु देवासोबतचे नाते संपल्याचे जाहीर केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prabhudheva got married to a physiotherapist in Mumbai in September: Source

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.