कधी प्रभुदेवावर भाळली होती नयनतारा आता विग्नेशच्या प्रेमात झालीय वेडी, पाहा Romantic फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 03:17 PM2020-06-07T15:17:11+5:302020-06-07T15:36:41+5:30

रोमॅन्टिक आहेत हे फोटो...साऊथची प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस नयनतारा सध्या प्रेमात आकंठ बुडालीय. होय, साऊथ दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबतचे तिचे रोमॅन्टिक फोटो पाहिल्यावर तुम्हालाही विश्वास बसेल.

विग्नेश आणि नयनतारा यांनी त्यांची रिलेशनशिपची अधिकृत घोषणा सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये केली होती. दोघे रेड कार्पेटवर आल्यानंतर त्यांनी आपली रिलेशनशिप जगजाहीर केली होते.

नयनतारा आणि विग्नेश यांनी 2015 मध्ये तामिळ फिल्म ‘नानुम राउडी धान’मध्ये एकत्र काम केले होते.

विग्नेशच्या आधी नयनतारा प्रभुदेवाच्या प्रेमात अधीच आकंठ बुडाली होती. अ‍ॅक्टर प्रभुदेवासोबत जुळले होते. दोघे लिव्ह इनमध्येही राहात होते.

एकेकाळी नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या अफेअरची टॉलिवूड मध्ये जोरदार चर्चा होती.

प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता.

2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लताने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती. प्रभुदेवा, नयनतारासोबत लिव-इनमध्ये राहात असल्याचा आरोप तिने केला होता.

प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केले तर ती आमरण उपोषण करेल, अशी धमकीही तिने दिली होती.

नयनतारासोबत अफेअर सुरु झाल्यानंतर प्रभुदेवाना त्याचे 16 वर्षांपूवीर्चे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता.

जुलै 2011 मध्ये प्रभुदेवाना त्याची पत्नी लताला घटस्फोट दिला. पण पुढच्याच वर्षी म्हणते 2012 मध्ये प्रभुदेवासोबतचे माझे सर्व संबंध संपल्याचे नयनताराने जाहिर केले होते. तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते.