ठळक मुद्देप्रभास आणि अभिनेत्री काजल अग्रवाल काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. त्या दोघांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

बाहुबली या चित्रपटानंतर प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण प्रभासने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. आम्ही केवळ चांगले फ्रेंड्स आहोत, असे तो म्हणाला होता. पण तुम्हाला माहीत आहे का प्रभास अनुष्कासोबत नव्हे तर एका बॉलिवूडमधील अभिनेत्रीच्या प्रेमात होता. या अभिनेत्रीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून ती केवळ काहीच बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे.

प्रभास आणि अभिनेत्री काजल अग्रवाल काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. त्या दोघांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्या दोघांचे प्रेमप्रकरण जवळजवळ दीड वर्षं सुरू होते असे म्हटले जाते. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याची चर्चा रंगली होती. पण काही कारणास्तव त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी मीडियात न बोलणेच पसंत केले. ते दोघे आज नात्यात नसले तरी अनेकवेळा ते सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या कामाची प्रशंसा करत असतात. साहोच्या प्रमोशनच्या दरम्यान प्रभासला काजलबाबत विचारण्यात आले होते. पण त्याने केवळ ती त्याची चांगली मैत्रीण असल्याचे सांगितले होते. 

प्रभासने अलीकडे एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, ‘मला माझ्या खाजगी आयुष्यावर बोलायला आवडत नाही. त्यामुळे मला लग्नाबद्दल काही प्रश्न विचारु नका. मी लग्न करेन तेव्हा सर्वांना आवर्जून सांगेन.’   

प्रभासचा साहो हा चित्रपट काही आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले होते. ‘साहो’ नंतर प्रभासने पुन्हा एकदा साऊथचाच एक चित्रपट साईन केला आहे. दिग्दर्शक के के राधाकृष्ण यांचा हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.  


 

Web Title: Prabhas was dating Kajal Agarwal not anushka shetty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.