ठळक मुद्देदर्शकांमधल्या आपल्या लोकप्रियतेसोबतच हिंदी चित्रपट निर्मात्यांमध्ये असलेल्या बोलबाल्यामुळे प्रभास एक पाऊल पुढे आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहेत.

जगभरात रणबीर कपूर, वरुण धवन आणि प्रभास या तीन अभिनेत्यांचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. पहिली दोन नावे त्यांच्या डेब्यूपासूनच हॉट टॉपिक राहिली आहेत, मात्र प्रभास एकमेव असा अभिनेता आहे, जो आपल्या भारतीय लोकप्रियतेसोबत आता सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे आहे.

‘साहो’च्या यशानंतर, प्रभासला केवळ तेलुगु/तमिळ भाषेतूनच नाही तर हिंदी भाषिक लोकांकडून देखील व्यापक लोकप्रियता मिळत आहे. प्रभासची सफलता आणि स्टारडम पाहाता प्रत्येक चित्रपट निर्माता त्याच्यावर विशेष लक्ष ठेवून आहे. त्याच्या चित्रपटांकडे हमखास यशाचा फार्मुला म्हणून पाहिले जात आहे.

सुत्रांच्या मतानुसार, प्रभासला हिंदी मार्केटमध्ये आपले समकालीन रणबीर कपूर आणि वरुण धवन यांच्याहून अधिक रक्कम मिळते. रणबीर आणि वरुण यांना आपल्या चाहत्यांमध्ये पुष्कळ मागणी असली तरी दर्शकांमधल्या आपल्या लोकप्रियतेसोबतच हिंदी चित्रपट निर्मात्यांमध्ये असलेल्या बोलबाल्यामुळे प्रभास एक पाऊल पुढे आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहेत. सॅटॅलाईट राईट्सच्या खरेदीपासून वितरण बाजारापर्यंत, प्रभास चित्रपट उद्योगातील इतर मोठ्या सेलिब्रिटीच्या तुलनेत नंबर गेममध्ये सर्वात पुढे आहे.

रणबीर कपूरचा "ब्रह्मास्त्र" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर वरुण धवन "कुली नं 1" या त्याच्या आगामी चित्रपटाद्वारे मनोरंजन करणार आहे. त्याचवेळी प्रभास नाग अश्विन दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. 

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र बाहुबली- द बिगिनिंग आणि बाहुबली- द कन्कल्युजन या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहोचली आहे.

आपल्या 14 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ 19-20 चित्रपट केले आहेत. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानप्रमाणेच प्रभासही वर्षाला एकच चित्रपट करतो. प्रभास राजकुमार हिरानींचा मोठा चाहता आहे. त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘3 इडियट्स’ 20 हे चित्रपट वेळा पाहिले आहेत.अख्ख जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख, सलमान आणि दीपिकाचा तो फॅन आहे. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे.

Web Title: Prabhas fees for bollywood movies PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.