साऊथचा सुपरस्टार प्रभासचं चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे आपल्याला पहायला मिळालं आहे. आता तेलंगणातील प्रभासच्या डाई हार्ट फॅननं नुकतंच असं काही केलं जे पाहून सगळेच जण हैराण झाले आहेत. प्रभासला भेटण्यासाठी हा चाहता हट्टाला पेटला होता आणि मोबाईल टॉवरवर चढला होता. प्रभास भेटला नाही तर टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करेन, अशी धमकी त्यानं दिली.

सोशल मीडियावर प्रभासच्या या क्रेझी फॅनचा मोबाईल टॉवर चढतानाचा फोटो समोर आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, चाहता मोबाईल टॉवरवर चढला आणि तिथून उडी मारण्याची धमकी देत होता. तो बोलत होता की जर प्रभाससोबत माझी मीटिंग अरेंज केली नाही तर मी टॉवरवरून उडी मारेन. पोलीस आणि तिथे उपस्थित असलेले लोक त्याची खूप समजूत काढत होते. मात्र त्याने खाली येण्यास नकार दिला. त्यानंतर त्याची समजूत कशी काढली हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसंच प्रभासला या घटनेबद्दल सांगितलं आहे की नाही याबद्दल अद्याप काहीही समजू शकलेलं नाही.

यापूर्वी प्रभासच्या साहो चित्रपटाच्या रिलीजवेळी आंध्र प्रदेशमधील चित्रपटाचा बॅनर थिएटरवर लावताना एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. प्रभास बाहुबली चित्रपटामुळे देशभरात खूप लोकप्रिय झाला आहे.

30 ऑगस्टला प्रभासचा साहो चित्रपट प्रदर्शित झाला. निगेटिव्ह रिव्हुजनंतरही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली. 350 कोटीच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात 10 दिवसांत 400 कोटींची कमाई केली आहे.

साहोनंतर प्रभास एका रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे दिसणार आहे. 

 

 

Web Title: Prabhas fan climbs mobile-phone tower to demand meeting with Saaho star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.