सध्या प्रभास त्याचा आगामी सिनेमा साहोला घेऊन चर्चेत आहे. बाहुबलीनंतर प्रभास हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. साहोसोबतच प्रभास त्याच्या लव्ह लाईफला घेऊनदेखील लाईमलाईटमध्ये आहे. प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या रोमान्सची चर्चा अनेक महिन्यांपासून रंगली आहे. जवळपास दोघे एकमेकांचे 10 वर्षांपासून मैत्र आहेत.   २००९ मध्ये आलेल्या ‘बिल्ला’ या चित्रपटात अनुष्का शेट्टी आणि प्रभासने एकत्र काम केले होते. प्रभासने अनुष्काला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता.  


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, प्रभास आणि अनुष्कासाठी अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधल्या लॉस एंजलिसमध्ये घर शोधतोय. काही दिवसांपूर्वी प्रभासने अनुष्कासाठी साहोचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवल्याची माहिती आहे. ते कधी, कुठे, कसं याबाबतची काही माहिती नाही. या स्पेशल स्क्रिनिंगबाबत प्रभासने स्वत: काही खुलासा केलेला नाही. प्रभास आणि अनुष्का एकमेकांना बघितल्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत. शूटिंगदरम्यान, हे दोघे एकमेकांशी तासनतास व्हिडीओ चॅट करीत असल्याचे समजते.


प्रभासच्या साहोबाबत बोलायचे झाले तर यात प्रभासशिवाय श्रद्धा कपूर,नील नितीन मुकेश, चंकी पांडे, मंदिरा बेदी असे अनेक कलाकार आहेत.‘साहो’मध्ये श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे.

त्यात प्रभास दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. 30 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Web Title: Prabhas and his rumoured girlfriend anushka shetty searching house in los angeles to buy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.