Poonam Pandey gets husband Sam Bombay arrested for assault days after their marriage | पतीनं विनयभंग केल्याचा पूनम पांडेचा आरोप; पतीला गोवा पोलिसांकडून अटक

पतीनं विनयभंग केल्याचा पूनम पांडेचा आरोप; पतीला गोवा पोलिसांकडून अटक

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव : आपल्या सेमी न्यूड पोजेससाठी लोकप्रिय ठरलेल्या बॉलीवूड सेन्सेशन पूनम पांडे हिने सध्या गोव्यातही खळबळ निर्माण केली आहे. काणकोण येथे शूटिंगसाठी आलेले असताना आपला पती सॅम बॉम्बे याने आपला विनयभंग केल्याची तक्रार पूनम पांडेने केली आहे. त्यानंतर काणकोण पोलिसांनी त्याला अटक केली.

सॅम बॉम्बे (मूळ नाव सॅम अहमद)  हा व्यवसायाने फिल्म प्रोड्युसर असून हल्लीच म्हणजे 1 सप्टेंबर रोजी त्याचे आणि पुनमचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर ते फिल्म शूटिंगसाठी सध्या गोव्यात आले होते. पाळोले काणकोण येथे सरोवर या हॉटेलात ते दोघे सध्या राहत होते. सॅमने आपल्याला मारहाण केली आणि विनयभंग केला असे तिने म्हटले आहे. काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण याना याबद्दल विचारले असता मंगळवारी सॅमला पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. 

पूनम पांडे ही आपल्या हॉट अदांसाठी सिने रसिकांमध्ये प्रसिद्ध असून तिच्या ट्विटर व इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या सेमी न्यूड फोटोमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Poonam Pandey gets husband Sam Bombay arrested for assault days after their marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.