Pooja Hegde gave to the entire team of 'Housefull 4' Trit | पूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट
पूजा हेगडेने 'हाऊसफुल ४'च्या संपूर्ण टीमला दिली ट्रिट

ठळक मुद्दे'हाऊसफुल ४' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री पूजा हेगडेने हृतिक रोशनच्या मोहजोंदारो चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. मात्र यातील भूमिकेतून पूजाने रसिकांच्या मनात घर केले. आता ती साजिद नाडियादवालाची यशस्वी कॉमेडी सीरिजचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल ४'मध्ये दिसणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. तिने 'हाऊसफुल ४'मधील कलाकार व तंत्रज्ञ टीमला मँगलोरियन पदार्थांची ट्रीट दिली.   

पूजा हेगडेचा तमीळ चित्रपट 'अरविंदा समेथा' नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या खुशीत तिने 'हाऊसफुल ४' च्या सेटवरील कलाकारांसह संपूर्ण क्रुला मँगलोरियन पदार्थ खाऊ घातले.
पूजाने सांगितले की,' काही दिवसांपूर्वी माझ्या आईने माझे आवडते मँगलोरियन पदार्थ संपूर्ण टीमसाठी बनवले होते. यात कोरी रोटी, चिकन सुखा व पायसम या पदार्थांचा समावेश होता. आईने सेटवर दुपारी हे पदार्थ पाठवले होते. या पदार्थांचा आस्वाद सेटवरील सर्वांनी घेतला. त्यामुळे मी खूप खूश आहे. माझ्या आईला पदार्थ बनवायला खूप आवडते. ती मला अप्पम किंवा इतर नाश्ता नियमित सेटवर पाठवते.' 
'हाऊसफुल ४' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पूजासोबत अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सेनॉन व क्रिती खरबंदा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचे लंडन व राजस्थानमधील दोन शेड्युलचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे मुंबईतील चित्रीकरणदेखील पूर्ण झाले आहे. 


Web Title: Pooja Hegde gave to the entire team of 'Housefull 4' Trit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.