लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 08:30 PM2021-05-09T20:30:12+5:302021-05-09T20:51:48+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून अलायाच्या डेटींगच्या चर्चा आहेत. या चर्चांबद्दल विचारले असता, पूजाने बिनधास्त मत मांडले.

pooja bedi opens up on her daughter alaya furniturewalla dating with aaishvary thackeray | लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

Next
ठळक मुद्देअलाया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे विविध अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.  जवानी जानेमन  या चित्रपटात अलायाने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती.

एकेकाळी पूजा बेदी (Pooja Bedi) बॉलिवूडची स्टार होती. आता तिची लेक अर्थात अलाया फर्निचरवाला (Alaya Furniturewalla) स्टार बनलीये. आता बॉलिवूड स्टार्स म्हटल्यावर त्यांच्याबद्दलच्या चर्चाही होणार. अलायाही अधूनमधून रिलेशनशिप गॉसिप्समुळे चर्चेत असते. एक आई या नात्याने अशा चर्चेबद्दल पूजा बेदीला काय वाटते? एका ताज्या मुलाखतीत ती यावर बोलली. (pooja bedi opens up on her daughter alaya furniturewalla dating )
गेल्या अनेक दिवसांपासून अलाया व ऐश्वर्य ठाकरे यांच्या डेटींगच्या चर्चा आहेत. या चर्चांबद्दल विचारले असता, पूजाने बिनधास्त मत मांडले. आता काळ बदललाये. माझ्यावेळी काळ वेगळा होता़ आता अलाया एक सेलिब्रिटी आहे आणि तिच्या पर्सनल लाईफबद्दलच्या चर्चा होणारच. माझ्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हा बॉयफ्रेन्ड नसणे, व्हर्जिन असणे, अविवाहित असणे एका अभिनेत्रीसाठी गरजेचे होते. आज प्रत्येक व्यक्तिला पर्सनल लाईफ आहे आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे, असे पूजा म्हणाली. यावेळी तिने करिना कपूरचे उदाहरणही दिले. करिना लग्नानंतर अधिक चांगले प्रोजेक्ट करतेय. माझ्या मते, इंडस्ट्रीत मोठा बदल झाला आहे आणि प्रेक्षकांची मानसिकता बदलल्यामुळे हे शक्य झाले आहे. हे बदल सोशल मीडियामुळे झालेत. यासाठी मी सोशल मीडियाला नक्कीच धन्यवाद देईन, असेही ती म्हणाली.

ऐश्वर्य ठाकरे हा बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा आहे. ऐश्वर्य ठाकरेचा वाढदिवस दुबईत दणक्यात साजरा झाला होता. या पार्टीत एका बॉलिवूड चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हा चेहरा कोणाचा तर बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिचा.
होय, ऐश्वयार्चा वाढदिवस साजरा करण्यासाठी अलाया दुबईला पोहोचली होती.  या पार्टीचा एक व्हिडीओ स्मिता ठाकरे यांनी शेअर केला होता. विशेष म्हणजे स्मिता यांनी हा व्हिडीओ शेअर करताना अलायाला टॅग केले होते.

त्याआधी अलायाच्या बर्थ डे पार्टीला ऐश्वर्यही हजर होता. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. शिवाय या फोटोची जोरदार चचार्ही रंगली होती. अलाया आणि ऐश्वर्य यांची ओळख काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या दोन वर्षांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. अलायाच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला देखील ऐश्वर्यने आवर्जून उपस्थिती लावली होती.  
अलाया अभिनेत्री पूजा बेदीची लेक आहे. पूजाने 1990 साली फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. पूजाला दोन मुले आहेत अलाया आणि ओमर. पती फर्निचरवालापासून पूजाने 2003 साली घटस्फोट घेतला होता. शारीरिक छळाचे कारण तिने सांगितले होते.  अलाया फर्निचरवालाने नुकतीच बॉलिवूडमध्ये  जवानी जानेमन  या चित्रपटाद्वारे एंट्री घेतली. या चित्रपटातील अलायाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. हा चित्रपट पाहाताना  अलायाचा हा डेब्यू चित्रपट असल्याची जाणीव देखील होत नसल्याचे अनेकांनी या चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये म्हटले होते. 

अलाया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे विविध अंदाजातील फोटो पोस्ट करत असते.  जवानी जानेमन  या चित्रपटात अलायाने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील तिचा अभिनय, तिचे सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pooja bedi opens up on her daughter alaya furniturewalla dating with aaishvary thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app