ठळक मुद्देअलायाचा डेब्यू सिनेमा ‘जवानी जानेमन’ येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

एकेकाळची बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला सध्या जाम चर्चेत आहे. होय, अलाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. सैफ अली खानसोबत ‘जवानी जानेमन’ या सिनेमातून अलायाचा डेब्यू होतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.  सध्या ती सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अलाया तिच्या आईच्या दुस-या लग्नाबद्दल बोलली.


होय, अलायाची आई पूजा बेदी दुसरे लग्न करणार आहे. गत फेबु्रवारीत वयाच्या 49 व्या वर्षी पूजाने मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला. लवकरच पूजा व मॅनेक लग्नबंधनात अडकणार आहेत. पूजाने 1994 मध्ये मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले होते. दोघांना अलाया आणि उमर अशी दोन मुले झालीत. मात्र लग्नाच्या 12 वर्षांनंतर पूजा व फरहान दोघांचा घटस्फोट झाला होता. आता पूजा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. यावर अलायाला काय वाटते, यावर ती बोलली.

माझी आई या वयात लग्न करतेय, यावर माझा काहीही आक्षेप असण्याचे कारण नाही. मॅनेक अंकल खूप चांगले आहेत. मला आणि माझ्या भावाला दोघांनाही ते आवडतात. आई आणि त्यांचा साखरपुडा झाला आहे. पण ते दोघे लग्न कधी करणार, हे मात्र मला ठाऊक नाही, असे अलायाने यावेळी सांगितले.


याशिवाय अलायाने तिच्या आईचे आजोबा कबीर बेदी यांच्याशी असलेल्या नात्याबद्दलही खुलासा केला. ती म्हणाली, त्या दोघांमध्ये बरेच गैरसमज होते. पण त्यासाठी आईने कधीच आजोबांना भेटण्यापासून मला थांबवले नाही. आता मात्र या दोघांमधील मतभेद दूर झाले आहेत.या संपूर्ण मुलाखातीत आलियाचा बिनधास्त स्वभाव समोर आला. 

अलायाचा डेब्यू सिनेमा ‘जवानी जानेमन’ येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Web Title: pooja bedi daughter alaia furniturewalla reacts on mother second marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.