आयशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. तिने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केले आहे. लग्नानंतर आयशा बॉलिवूडमधून गायब आहे. 

वयाच्या चौथ्या वर्षी आयशाने मॉडेलिंग सुरु केले. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चूनर उड उड जाऐ’ या म्युझिक अल्बममध्ये ती झळकली. या अल्बममुळे आयशा अचानक प्रकाशझोतात आली होती. विशेष बाब म्हणजे आयशा केवळ १५ वर्षांची होती त्यावेळी एका जॅकेट तयार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी मॉडलिंग करण्याची ऑफर तिला मिळाली होती. अन् तिनं देखील ही ऑफर स्विकारली. २००१ साली या कामासाठी तिला तब्बल ३ कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं.

वयाच्या १५ वर्षीच कोट्यवधींची मालकीण झाली म्हणून आयशा त्यावेळी चर्चेत होती. आयशाचे वडील गुजराती तर आई ब्रिटीश आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आली तेव्हा आयशाला हिंदीचा एकही शब्द बोलता येत नव्हता. पण अ‍ॅक्टिंग करिअरसाठी आयशा मोठ्या जिद्दीने हिंदी व तेलगू भाषा शिकली.


आयशा टाकियाने बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या चित्रपटात काम केले आहे. तिने करियरची सुरूवात २००४ साली टारझन द वंडर कार चित्रपटातून केली. त्यानंतर ती बऱ्याच चित्रपटात झळकली. २००९ साली ती सलमान खानसोबत वॉण्टेंड चित्रपटात पहायला मिळाली. पुढे सलमान खानच्या 'वॉन्टेड' या चित्रपटाने आयशाला मोठी ओळख दिली.यानंतर दिल मांगे मोर, शादी नंबर १, कॅश, पाठशाला, दे ताली अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.


याच काळात आयशाने अधिक सुंदर दिसण्यासाठी नाकाची प्लास्टिक सर्जरी केली. मात्र यामुळे तिचा चेहरा विचित्र दिसू लागला. त्यानंतर झालेली चूक सुधारण्यासाठी तिने ओठांची सर्जरी केली. त्यानंतर गालाची असे करतकरत तिने एकामागून एक अनेक ब्यूटी सर्जरी केल्या मात्र प्रत्येक सर्जरीगणीक तिचे सौंदर्य कमी होत गेले. परिणामी एक वेळ अशीही आली जेव्हा प्रेक्षक तिला चेटकीण म्हणून चिडवू लागले. प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे अखेर आयशाला चित्रपट मिळणे थांबले. 


२००९ मध्ये फरहान आजमीसह लग्नबंधनात अडकत तिच्या आयुष्यात बिझी झाली. आयशाचा शेवटचा चित्रपट मोड होता. हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत रणविजय सिंग मुख्य भूमिकेत होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Plastic surgery was expensive for the Bollywood actress, who became a billionaire at the age of 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.