ठळक मुद्देजे.पी.दत्ता आणि बिंदिया यांच्या निधी या मुलीचे नुकतेच त्यांनी धुमधडाक्यात लग्न केले.

गोलमाल या चित्रपटातील बिंदिया गोस्वामी ही अभिनेत्री तुम्हाला आठवत असेलच... तिने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. अभिनेता विनोद मेहरासोबत बिंदिया यांचे लग्न झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यांचे दुसरे लग्न जे.पी.दत्ता यांच्यासोबत झाले. 

जे.पी.दत्ता आणि बिंदिया यांच्या निधी या मुलीचे नुकतेच त्यांनी धुमधडाक्यात लग्न केले. निधीचे लग्न बिनॉय गांधीसोबत झाले. बिनॉय हा असिस्टंट डायरेक्टर आहे. निधी आणि बिनॉयच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली होती. 

निधी तिच्या लग्नाच्या साडीत खूपच छान दिसत होती. तिच्या लग्नाचा आऊटफिट प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केला होता. तिच्याप्रमाणेच तिची आई बिंदिया यांनी दागिने आणि कपडे घातले होते. जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये निधी आणि बिनॉय यांचे धुमधडाक्यात लग्न झाले. 

निधी आणि बिनॉय यांच्या लग्नाला अनू मलिक, अभिनेता सुनील शेट्टी आणि अर्जुन रामपाल यांनी हजेरी लावली होती. अर्जुन रामपाल तर त्याच्या कुटुंबियांसोबत दिसला. तसेच मनिष मल्होत्रा, रवीना टंडन, अमृता सिंग यांनी देखील या जोडप्याच्या लग्नात हजेरी लावत त्यांना आशीर्वाद दिला. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pictures from JP Dutta's daughter Nidhi Dutta's dreamy wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.