ठळक मुद्दे‘मलंग’ हातावेगळा करताच दिशा ‘राधे’ या सिनेमाचे शूटींग सुरु करणार आहे.

बॉलिवूड बाला दिशा पाटनी सध्या तिच्या ‘मलंग’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली असताना आता दिशाच्या नव्या हॉट फोटोंनीही चाहत्यांना वेड लावले आहे. दिशाने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल अकाऊंटवर शेअर केलेत आणि हे फोटो क्षणात व्हायरल झालेत.
पर्पल कलरच्या या ड्रेसमध्ये दिशा कमालीची हॉट दिसतेय. तिचा हा लुक खूप पसंत केला जात आहे. तिचा हा लुक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या तिच्या फोटोंना आतापर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या आहेत. 


दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘मलंग’सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दिशाने एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत.

चित्रपटातील तिच्या या बोल्ड लूकची सध्या इंटनेटवर खमंग चर्चा आहे. मोहित सूरीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.


‘मलंग’ हातावेगळा करताच दिशा ‘राधे’ या सिनेमाचे शूटींग सुरु करणार आहे. यात ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. याआधी तिने सलमानसोबत ‘भारत’ चित्रपटामध्ये काम केले होते. मात्र भारत हा चित्रपट बाक्स आॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण ‘राधे’ या चित्रपटाबद्दल मात्र प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. हा चित्रपट सलमानच्या ‘तेरे नाम’चा सीक्वल असल्याचे म्हटले जात आहे. 
  

Web Title: photoshoot of disha patani gone viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.