बॉलिवूडमध्ये सध्या स्टार डॉर्ट्सचा बोलबाला आहे. कारण दररोज एकतरी स्टार डॉर्ट्स चर्चेत असते. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, शाहरूखची मुलगी सुहाना, श्रीदेवीची मुलगी जान्हवी या नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. आता यामध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. नुकतेच टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसच्या सीजन ४ ची विजेती श्वेता तिवारीची मुलगी पलक हिने ग्लॅमर दुनियेत येण्याचे संकेत दिले आहेत. होय, पलकने सोशल मीडियावर तिचे असे काही बोल्ड फोटो शेअर केले, ज्यामुळे बि-टाऊनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पलकचे हे फोटो म्हणजे बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची एकप्रकारची तयारीच असल्याचे बोलले जात आहे. 

पलक सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटोज् शेअर करीत असते. पलक तिवारीने नुकतेच एक फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोंमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. कारण पलक या फोटोमध्ये खूपच हॉट अ‍ॅण्ड बोल्ड दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, श्वेता तिवारीची मुलगी पलक लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. अभिनेता दर्शिल सफारी याच्यासोबत ती झळकण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पलकच्या फोटोला युजर्सकडून वेगवेगळ्या स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या जात आहेत. यात काही सकारात्मक तर काही नकारात्मक कॉमेण्ट्सचा सहभाग आहे. पलकच्या या फोटोला आतापर्यंत १५ हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले आहे. तिच्या चाहत्यांकडून तर तिच्यावर कौतुकाचा वर्षावच केला जात आहे. Web Title: This photo of Shweta Tiwari's Lake Palak Tiwari shows the sensation on social media, photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.