ठळक मुद्देमधूने काही वर्षांपूर्वी आरंभ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

‘फुल और कांटे’ हा सिनेमा पाहिला असेल तर या चित्रपटातील एक सुंदर चेहरा क्षणात तुमच्या डोळ्यांपुढे येईल. होय, अभिनेत्री मधू. तिची ओळख करून द्यायचीच झाली तर सुंदर चेहरा, गोड हास्य आणि सहज सुंदर अभिनय अशी करून देता येईल़. बॉलिवूडचा एककाळ गाजवणारी अभिनेत्री मधू आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत...

26 मार्च 1972 रोजी मधूचा जन्म झाला.  
1990मध्ये मल्याळम सिनेमाद्वारे मधूने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि पुढे बॉलिवूड तिला खुणावू लागले. मधूचे नशीब इतके जोरावर होते की, ‘फुल और कांटे’ हा सिनेमा तिला मिळाला. या सिनेमाद्वारे मधूने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अजय देवगण व मधूचा 1991मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. चित्रपटातील गाण्यांनी तर लोकांना अक्षरश: वेड लावले आणि या चित्रपटासोबत मधू एका रात्रीत स्टार झाली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1992 साली ‘रोजा’ या सिनेमातही ती झळकली. हा सिनेमाही हिट झाला. यानंतर मधूने अनेक चित्रपटांत काम केले. 

मधूचे पूर्ण नाव मधुबाला रघुनाथ आहे. इंडस्ट्रीत तिला मधू नावाने ओळखले जाते.

बॉलिवूडची ड्रिम गर्ल हेमा मालिनी आणि अभिनेत्री जुही चावला यांच्यासोबत मधूचे खास नाते आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. होय, मधू ही हेमा मालिनी यांची भाची आहे. या नात्याने ईशा व अहाना देओल मधूच्या चुलत बहिणी आहेत.

जुही चावलासोबतही मधूचे नाते आहे. जुही ही मधूची नणंद आहे.  मधूने 1999 मध्ये बिझनेसमॅन आनंद शाहसोबत लग्न केले. आनंद हा जुही चावलाचा चुलत भाऊ आहे. या नात्याने जुही व मधू यांच्या नणंद वहिणीचे नाते आहे.

मधूने काही वर्षांपूर्वी आरंभ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. 2008 मध्ये ती कभी सोचा भी ना था या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती. 2011 मध्ये प्रदर्शित ‘मिस्टर कलाकार’ या सिनेमातही ती दिसली होती. मधू सध्या बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसली तरी साऊथच्या चित्रपटांमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे.


 

 

Web Title: Phool Aur Kante fame madhu birthday special unkhown facts-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.