Pathan movie controversy: 'बिकिनी वादा'नंतर पठाण चित्रपटात होणार बदल?; सेन्सॉर बोर्डाला हवाय 'बॅलन्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:17 PM2022-12-29T12:17:20+5:302022-12-29T12:17:57+5:30

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याचा ‘पठाण’ हा सिनेमा वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे.

Pathan movie controversy Changes in Pathan movie after deepika padukone saffron Bikini controversy Censor Board suggested changes | Pathan movie controversy: 'बिकिनी वादा'नंतर पठाण चित्रपटात होणार बदल?; सेन्सॉर बोर्डाला हवाय 'बॅलन्स'

Pathan movie controversy: 'बिकिनी वादा'नंतर पठाण चित्रपटात होणार बदल?; सेन्सॉर बोर्डाला हवाय 'बॅलन्स'

googlenewsNext

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा ‘पठाण’ ( Pathaan) हा सिनेमा वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याची. ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यानं वाद ओढवून घेतला.  दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आणि हिंदू संघटना याविरोधात रस्त्यावर उतरल्या. हा हिंदू धर्माचा अपमान आहे, असं सांगत या संघटनांनी शाहरूखच्या ‘पठाण’वर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं. दरम्यान, आता पठाण चित्रपटात आणि गाण्यात निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाने काही बदल सूचवले आहेत.

“सर्व प्रश्नांच्या निराकरणासाठी पठाण हा चित्रपट सीबीएफसी एक्झॅमिनेशन कमिटी फॉर सर्टिफिकेशनकडे पोहोचला आहे,” अशी माहिती सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिली. सीबीएफसीच्या कमिटीनं निर्मात्यांना सुधारित आवृत्ती बोर्डाकडे पाठवण्यापूर्वी चित्रपटात आणि गाण्यांमध्ये सूचवण्यात आलेले बदल करण्यास सांगितल्याचंही ते म्हणाले.

बोर्ड योग्य प्रक्रियेचे पालन करत असताना, त्यांना चित्रपट निर्मात्यांची सर्जनशील अभिव्यक्ती आणि व्यापक प्रेक्षकांच्या संवेदना यांच्यातील योग्य संतुलन शोधायचं होतं, असंही जोशी यांनी स्पष्ट केलं. निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातील विश्वासाचं रक्षण करणं महत्वाचे आहे आणि निर्मात्यांनी त्या दिशेनं काम करत राहण्यास सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं.

‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख तब्बल चार वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Pathan movie controversy Changes in Pathan movie after deepika padukone saffron Bikini controversy Censor Board suggested changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.