ठळक मुद्देकबीर बेदी आणि परबीन बाबी यांच्यात अफेअर सुरू असताना परबीन या यशाच्या शिखरावर होत्या. पण त्यांनी त्यांच्या या नात्यासाठी त्यांचे करिअर देखील सोडले होते.

'खून भरी मांग' या सिनेमामधील खलनायक किंवा 'मैं हूँ ना' मधील जनरल बक्षी म्हणून आपण कबीर बेदी यांना ओळखतो. त्यांनी अभिनेते, प्रेझेंटर आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कबीर बेदी नेहमीच त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कबीर बेदी यांनी त्यांच्या आयुष्यात चार लग्नं केली. कबीर बेदी यांच्या अनेक प्रेमप्रकरणांची देखील मीडियात नेहमीच चर्चा रंगली. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांनी बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

कबीर बेदी यांचा जन्म 16 जानेवारी 1946 मध्ये लाहोरमध्ये झाला. जेम्स बॉन्डच्या चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत झळकले होते. कबीर बेदी यांचे पहिले लग्न प्रसिद्ध ओडिसी डान्सर प्रोतिमा गौरी यांच्यासोबत झाले होते. त्यांना पूजा आणि सिद्धार्थ अशी दोन मुले देखील आहेत. पण लग्नानंतर काहीच वर्षांत त्यांच्या आयुष्यात परवीन बाबी यांचा प्रवेश झाला. दोघांनी बुलेट या चित्रपटात काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. ते जवळजवळ तीन वर्षं तरी एकमेकांसोबत नात्यात होते. 

कबीर बेदी आणि परवीन बाबी यांच्यात अफेअर सुरू असताना परबीन या यशाच्या शिखरावर होत्या. पण त्यांनी त्यांच्या या नात्यासाठी त्यांचे करिअर देखील सोडले होते. त्याचदरम्यान कबीर बेदी यांना एका इटालियन कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमामुळे त्यांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली. ते त्याकाळात काही वर्षं युरोपमध्ये राहात होते. त्यावेळी परवीन देखील त्यांच्यासोबत युरोपमध्ये राहात होत्या. पण दोघांमध्ये काहीच काळात दुरावा निर्माण झाला आणि परबीन यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केला. 

कबीर बेदी यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवसाला परवीन दुसांज या मॉडेलसोबत लग्न करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी दोघांनी 10 वर्षांच्या अफेअरनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे लग्नाच्या कित्येक वर्षं आधी लीव्ह इन मध्ये राहात होते. त्या दोघांमध्ये जवळजवळ 29 वर्षांचे अंतर आहे. 

Web Title: parveen babi left bollywood for kabir bedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.