लवकरच फुलराणी सायना नेहवालच्या जीवनावर सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यांत अभिनेत्री परिणिती चोप्रा प्रमुख भूमिका साकारणार आहे. सायनाच्या भूमिकेसाठी परिणिती बराच घाम गाळते आहे. फिटनेस आणि ट्रेनिंगवर ती अधिक लक्ष देत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी बॅडमिंटनचे धडे घेत असताना परिणितीला मोठी दुखापत झाली. यांत तिचा खांदा दुखावला गेला. आता हळूहळू या दुखापतीमधून ती सावरत असून लवकरच पुन्हा एकदा बॅडमिंटन कोर्टवर या खेळाचे बारकावे शिकताना पाहायला मिळेल. येत्या काही दिवसांत परिणितीसाठी बॅडमिंटनचे धडे घेण्याची प्रक्रिया आणखी खडतर होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात बॅडमिंटन खेळताना दाखवण्यासाठी परिणितीला कोणीही बॉडी डबल नसेल.

परिणितीच स्वतः बॅडमिंटन खेळतानाचे सीन करेल. सायना नेहवाल साकारताना परिणिती हुबेहूब तिच्यासारखीच वाटावी.शिवाय त्यात डुप्लिकेटकडून सीन चित्रित करुन कुठल्याही प्रकारची तडजोड करणं दिग्दर्शक अमोल कोल्हे यांना मान्य नाही. रुपेरी पडद्यावर सायना साकारणाऱ्या परिणिती आणि रिअल सायनामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर वाटू नये असं अमोल गुप्तेंची इच्छा आहे.

यांत थोडा जरी फरक वाटला तर सिनेमाला त्याचा फटका बसेल असं गुप्ते यांना वाटतं. या एका कारणामुळेच या सिनेमातून अभिनेत्री श्रद्धा कपूरची एक्झिट झाली. एका खऱ्याखुऱ्या बॅडमिंटनपटूची झलक श्रद्धामध्ये दिसत नसल्याने तिला या सिनेमातून बाहेर पडावं लागलं. सायनासारखं हुबेहूब वाटावं यासाठी परिणिती तिला बॅडमिंटन कोर्टवर खेळताना पाहत नवनवीन बारकावे शिकण्याचा प्रयत्न करेल. अशी मेहनत घेण्यासाठी किंवा तितकासा वेळ देण्याकरिता श्रद्धा तयार नव्हती. यासाठी  त्यामुळेच की या सिनेमातून ती आऊट झाली.

Web Title: Parineeti Chopra Wont Get Body Doub;e To Play Saina Nehwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.