परिणीती चोप्रा लवकरच जबरिया जोडी चित्रपटात झळकणार आहे आणि सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातून ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका वाहिनीशी बोलताना तिने सांगितलं की, मला सुरूवातीला जेव्हा एकता कपूरने चित्रपटासाठी फोटो केला होता. तेव्हा मला हा चित्रपट इतका इंटरेस्टिंग वाटला नाही. 


परिणीतीने सांगितलं की, त्यावेळी मला वाटलं की एकता कोणतातरी चित्रपट बनवतेय आणि मला ऑफर केला आहे. मात्र जेव्हा मी चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकली तेव्हा मी ऐकल्यावर जोरजोरात हसू लाहले. तिथे असलेले सगळे लोक हैराण होऊन माझ्याकडे पहात होते. मी हसत स्क्रीप्ट पूर्ण वाचली आणि ठरवलं की हा चित्रपट करायचा.


परिणीतीने पुढे सांगितले की, चित्रपटात पटना दाखवलं गेलं आहे. पण, चित्रीकरण लखनऊमध्ये केलं आहे. सिद्धार्थसोबत आधी काम केलं आहे. त्यामुळे आमची चांगली बॉन्डिंग आहे. त्यामुळे काहीच फिल्मी वाटत नाही आणि मैत्रीमध्ये सर्व गोष्टी आणखीन चांगल्या होतात. मी पंजाबी आहे आणि मला बिहारी भाषा बोलायची होती. त्यामुळे तो देसी अंदाज येईल की नाही याचं थोडंसं दडपण होते. मात्र मी आणि सिद्धार्थने देसी भाषा शिकण्यासाठी प्रशिक्षकाची मदत घेतली. जेणेकरून आम्हाला रुपेरी पडद्यावर भूमिका साकारताना वास्तविक वाटलं पाहिजे.


जबरिया जोडी चित्रपटाची कथा बिहारमध्ये जबरदस्तीने लावल्या जाणाऱ्या लग्नावर आधारीत आहे. लग्नाबाबत परिणीतीला विचारलं असता तिनं सांगितलं की, माझ्या घरातील कोणीच अद्याप माझ्या लग्नाबद्दल बोलत नाही. पण कामाबद्दल नक्कीच बोलतात. मात्र लग्न अशाच मुलाशी करेन ज्याचं माझ्यावर प्रेम असेल आणि आदर असेल. मुलगा सिनेइंडस्ट्रीतीस असला पाहिजे हे गरजेचं नाही.


परिणीती चोप्रासिद्धार्थ मल्होत्रा यांचा जबरिया जोडी चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याच दिवशी सोनाक्षी सिन्हा व बादशाह यांचा खानदानी शफाखाना प्रदर्शित होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parineeti Chopra wants life partner like her thought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.