चुलबुला अंदाज हसमुख चेहरा असलेली अभिनेत्री  म्हणजे परिणीती चोप्रा. विविध सिनेमात  परिणीतीने वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. परिणीती सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. तिचा असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  

ऊस खात असल्याचे या व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळेल. दाताने ऊस तोडून खाणे परिणीतीला काही जमत नाहीय. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकजण तिची खिल्ली उडवत आहेत. अनेकांनी  क्या आपकी टूथपेस्ट में नमक हैं? अशा कमेंट करत तिची मस्करी करत असून तिच्या व्हिडीओची मजा घेत आहेत. 

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर परिणीती चोप्रा दिग्दर्शक रिभू दास गुप्ता यांचा आगामी सिनेमा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’मध्ये एक अंडरकव्हर एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची कथा भारतीय एजंटांना वाचविण्याच्या मोहिमेवर असलेल्या परिणीतीच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणार आहे.

"सिनेमाची कथा भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात परिणिती एजंटची मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमात रजित कपूर, केके मेनन, दिव्येंदु भट्टाचार्य आणि हार्डी संधूही दिसणार आहेत.याशिवाय परिणीती भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहओवालच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यात परिणीती सायना नेहवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

एका मुलाखतीत दरम्यान परिणीतीने सांगितले होते की, ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात.

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. याच दीपिकाने 2015 मध्ये 'पीकू' बनून चाहत्यांची मनं जिंकली होती. या सिनेमासाठी दीपिकाने अनेक अॅवॉर्ड्सदेखील आपल्या नावावर केले होते.

'पीकू'मध्ये दीपिकाने अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र या सिनेमासाठी दीपिका मेकर्सची पहिली चॉईस नव्हती स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा मेकर्सची पहिली चॉईस होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parineeti Chopra Learns How To Eat Sugarcane From Her Father Sweet Video Will Make Your Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.