ठळक मुद्दे प्रियंका आणि निक हे लवकरच विभक्त होणार असल्याचे वृत्त दिले होतेनिक आणि प्रियंका फॅमिलीसोबत मियामीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय

प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाला सहा महिनेपण पूर्ण झालेले नाहीत तोवर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एक मॅगझीनने प्रियंका - निकच्या संसारात काही आलबेल नसल्याची बातमी दिली होती. त्यानंतर अनेक उलटं सुलटं चर्चा सुरु झाल्या. प्रियांका चोप्राची बहीण परिणीती चोप्राने या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

परिणीतीने घटस्फोटाच्या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. यात काहीच तथ्य नसल्याचे तिने म्हटले आहे. त्या मॅगझीनमध्ये जे काही छापून आले होते तर फारच विचित्र होते. मला यावर सार्वजनिक ठिकाणी कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. माझी यावर जी काही प्रतिक्रिया आहे ती आमच्या कुटुंबीयांना पुरतीच मर्यादीत आहे. 

एक मॅगझीनमध्ये प्रियांका आणि निक हे लवकरच विभक्त होणार असल्याचे वृत्त दिले होते. प्रियंकासोबत निकचे वारंवार खटके उडतायेत. निकला प्रियंका फारच समजूतदार मुलगी वाटली होती, मात्र तसे नाहीय असा दावा या मॅगझीनने केला होता. याआधी प्रियंकावर निकसोबत पैशासाठी लग्न केल्याचा एका मॅगझीनमध्ये छापून आले होते. मात्र त्यावेळी ही याबातमीत काहीच तथ्य नसल्याचे तिने सांगितले होते. सध्या निक आणि प्रियंका फॅमिलीसोबत मियामीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.  

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर लवकरच प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित होतोय. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूडपटातही ती दिसणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर व जायरा वसीम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
 

Web Title: Parineeti chopra lashes out at article which called priyanka chopra a scam artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.