सोशल मीडियावर पसरली परेश रावल यांच्या निधनाची अफवा, ‘बाबुराव आपटें’ची प्रतिक्रिया वाचून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 04:29 PM2021-05-14T16:29:53+5:302021-05-14T16:36:31+5:30

Paresh Rawal death rumor : आज सकाळी परेश रावल यांच्या निधनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांनी या अफवेवर मोठी मजेदार प्रतिक्रिया दिली.

paresh rawal becomes victim of death hoax actor gives-hilarious reaction | सोशल मीडियावर पसरली परेश रावल यांच्या निधनाची अफवा, ‘बाबुराव आपटें’ची प्रतिक्रिया वाचून पोट धरून हसाल

सोशल मीडियावर पसरली परेश रावल यांच्या निधनाची अफवा, ‘बाबुराव आपटें’ची प्रतिक्रिया वाचून पोट धरून हसाल

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी करोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर 18 दिवसांनी परेश रावल यांना करोनाची लागण झाली होती. आता ते कोरोनातूनही बरे झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या निधनांच्या अफवा व्हायरल होत आहेत. मुकेश खन्ना, मिनाक्षी शेषाद्री, किरण खेर, लकी अली अशा अनेकांच्या निधनाच्या अफवा अलीकडे पसरल्या. आता काय तर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांच्या निधनाच्या  अफवांचे पेव फुटले. 
आज सकाळी परेश रावल यांच्या निधनाची पोस्ट (Paresh Rawal death rumor) सोशल मीडियावर व्हायरल झाली. 14 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजता परेश रावल यांचे निधन झाले, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. ही पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का बसला. पण क्षणात ही पोस्ट अफवा असल्याचे सिद्ध झाले. खुद्द परेश रावल यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी या अफवेवर मोठी मजेदार प्रतिक्रिया दिली. (Paresh Rawal reaction on his death hoax)

 परेश रावल यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टचा स्किनशॉर्ट शेअर केला. ‘गैरसमजाबद्दल दिलगीरी व्यक्त करतो, कारण सकाळी 7 वाजता मी झोपलेलो होतो,’ असे मजेदार ट्विट त्यांनी केले.
त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्यात. यानंतर यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.  ‘हेरा फेरी’ आणि ‘हेरा फेरी २’ या चित्रपटातील परेश रावल यांच्या बाबुरावच्या भूमिकेने सगळ्यांनी मने जिंकली. बाबुरावची धमाल कॉमेडी प्रेक्षकांच्या अजून ही लक्षात आहे. 

मी एकदम ठणठणीत
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निधनाच्या बातमीचे खंडन केले. या अशा अफवा कोण पसरवतो, मला माहित नाही़ पण मी एकदम ठणठणीत आहे. मला आज सकाळपासून अनेक लोकांचे फोन येत आहेत. माझ्या निधनाची बातमी खोटी आहे. अशा अफवांची मी निंदा करतो. सोशल मीडियाचा हाच प्रॉब्लेम आहे. यावर लोक अशा अफवा पसरवतात. माझ्यासोबत माझ्या सर्व चाहत्यांचे आशीर्वाद आहेत. अशात मला काय होणार? तरीही माझ्याबद्दल चिंता व्यक्त करणा-यांचे मी आभार मानतो, असे ते म्हणाले.
 काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी करोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर 18 दिवसांनी परेश रावल यांना करोनाची लागण झाली होती. आता ते कोरोनातूनही बरे झाले आहेत.
 

Web Title: paresh rawal becomes victim of death hoax actor gives-hilarious reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.