ठळक मुद्देएका युजरने तर ‘अर्जुन कपूरला घेऊन आशुतोष गोवारीकर यांनी सगळ्या चित्रपटाचा सत्यानाश केला,’ अशी थेट प्रतिक्रिया दिली आहे.

पानिपत’ या बहुचर्चित चित्रपटचा ट्रेलर काल रिलीज झाला. अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सॅनन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रेलरमधील संजय दत्तच्या अदाकारीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतेय. क्रिती सॅननचा मराठमोळा अंदाजही लोकांना भावला आहे. पण अर्जुन कपूरने मात्र लोकांची निराशा केल्याचे दिसतेय. होय, सोशल मीडियावर अनेकांनी ‘पानिपत’चा ट्रेलर पाहून अर्जुनला ट्रोल केले आहे. इतके की, अनेक नेटिजन्सनी आशुतोष गोवारीकर यांची कास्टिंग चुकल्याचे म्हटले आहे.
 ‘पानिपत’चा ट्रेलर पाहिल्यानंतर बहुतांश  युजर्सनी अर्जुन कपूरबद्दल निगेटीव्ह कमेंट्स दिल्यात.  

एका युजरले लिहिले, मी या सिनेमाच्या ट्रेलरची खूप आतुरतेने वाट पाहत होते. मात्र हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर माझी निराशा झाली. विशेषत: अर्जुन कपूर या सिनेमासाठी योग्य नाही कारण त्याच्या चेह-यावर एका योद्ध्याकडे असणारी आक्रमकता आणि भाव नाहीत. तो कुठूनही योद्धा वाटत नाही.  कास्टिंग खराब आहे.’

दुस-या युजरने मात्र ट्रेलरमधील संजय दत्तच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. ‘नकारात्मक भूमिकेत संजय दत्तने कमाल केली आहे. ‘अग्नीपथ’मध्ये मोठ्या मुश्किलीने हृतिक रोशन त्याचा सामना करु शकला होता. पण या सिनेमात अर्जुन कपूरला घेऊन गोवारिकरांनी मोठी चूक केली’, असे या युजरने म्हटले आहे. एका युजरने तर ‘अर्जुन कपूरला घेऊन आशुतोष गोवारीकर यांनी सगळ्या चित्रपटाचा सत्यानाश केला,’ अशी थेट प्रतिक्रिया दिली आहे. एकाने प्रतिक्रिया देताना ‘लो बजेट व्हर्जन आॅफ बाजीराव मस्तानी’ असे लिहिले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: panipat trailer arjun kapoor troll for his role in film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.