pakistani pop singer rabi pirzada left the industry after nude photos were leaked | न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर या पॉप सिंगरने सोडली इंडस्ट्री
न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर या पॉप सिंगरने सोडली इंडस्ट्री

ठळक मुद्देगत महिन्यात रबीने काही साप व अजगरांसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि हे साप व अजगर मोदींच्या अंगावर सोडण्याची धमकी दिली होती.

पाकिस्तानची पॉप सिंगर रबी पीरजादा ही कायम चर्चेत असते. मध्यंतरी अंगावर बॉम्ब जॅकेट घालून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर ती चर्चेत आली होती. याच रबीवर आता ग्लॅमरस करिअर सोडण्याची वेळ आली आहे. होय, अलीकडे रबीचे न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेत आणि यानंतर रबीने इंडस्ट्री सोडत असल्याचे जाहीर केले. ‘मी रबी पीरजादा इंडस्ट्री सोडत आहे. अल्लाह, माझ्या पापांना माफी देवो. लोकांच्या माझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलो,’ असे तिने लिहिले.
रबीने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. अंगावर बॉम्ब जॅकेट घातलेला एक फोटो ट्विट करत, ‘मोदी हिटलर, मला तुम्हाला मारण्याची इच्छा आहे. काश्मीर की बेटी’, असे तिने लिहिले होते. अलीकडे तिचे काही न्यूड व्हिडीओ व्हायरल झाले होते.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याशी वाद झाल्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झालेत अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर असीफ गफूर यांच्याशी तिचे ट्विटरवरून भांडण झाले होते. त्यानंतर तिचे हे व्हिडीओ व्हायरल झालेत होते. या न्यूड व्हिडीओनंतर पाकिस्तानी लोकांनी रबीवर सडकून टीका केली होती.  याचमुळे तिचे नाव पाकिस्तानात ट्विटरवर ट्रेंड झाले होते. या वादानंतर रबीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
गत महिन्यात रबीने काही साप व अजगरांसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि हे साप व अजगर मोदींच्या अंगावर सोडण्याची धमकी दिली होती. यापश्चात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या वन्यजीव संरक्षक विभागाने तिच्याविरोधात कारवाई सुुरू केली होती. शिवाय लाहोरच्या एका न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केला होता.

Web Title: pakistani pop singer rabi pirzada left the industry after nude photos were leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.