अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे रिलेशनशीप आता जगजाहिर झाले आहे. मात्र अजूनही लोकांना त्यांच्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. हे बऱ्याचदा त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवरून पहायला मिळते. पुन्हा एकदा त्यांच्या फोटोंवर वाईट कमेंट्स होताना पहायला मिळाले. ज्यानंतर काही लोक त्यांच्या बाजूने बोलताना दिसले. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा एक फोटो पॅपराझीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोत ते दोघे कारमध्ये बसताना दिसले. साधारण असणाऱ्या या फोटोवर लोकांनी एकानंतर एक इतके वाईट कमेंट्स केल्या की त्या वाचताना लाज वाटते. यात तर काहींनी त्यांना जोड्याने हाणले पाहिजे असे लिहिले आहे. तर काहींनी घर तोडू, म्हातारीसोबत अर्जुन म्हातारा झाला, आई-मुलगा यासारख्या कमेंट केल्या.


मलायका अरोराने एका मुलाखतीत सांगितले होते की, आजही भारतीय समाजात घटस्फोटीत महिलेला मुव्ह ऑन होणे खूप कठीण आहे. तर दुसरीकडे पुरूषांना नवीन नात्यात जाणे आणि नॉर्मल जीवन जगणं खूप सहज आहे.


यापूर्वी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलाइका म्हणाली होती की, 'पुरुष जेव्हा पुढे निघून जातो तेव्हा काही फरक पडत नाही, परंतु जेव्हा एखादी स्त्री तसं करते ते तेव्हा पाप आहे, का?' जेव्हा एखादा माणूस त्याच्यापेक्षा लहान असलेल्या महिलेला डेट करतो, तेव्हा लोक त्याला ड्यूड म्हणतो, परंतु जर एखादी स्त्री तिच्यापेक्षा लहान मुलाला डेट करते तेव्हा सगळ्यांना ते खटकते.


मलायका म्हणाली, 'नेहमीच हा भेदभाव होत आला आहे. हे वाईट आहे आणि मला आशा आहे की यात बदल होईल. बरेच काही बदलत आहे परंतु तिथे पोहोचायला अजून थोडा वेळ लागेल.


मलायका अरोराने २०१९मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवशी त्यांचं नांत ऑफिशल केलं होतं. मलायकाने अर्जुनबरोबर तिचा फोटो पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तसे, मलायका आणि अर्जुन यापूर्वीही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते, परंतु तोपर्यंत त्यांनी हे स्वीकारलेले नव्हते की ते एकमेकांना डेट करतायेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'The pair should be beaten by these two', the fans got angry when they saw Arjun-Malaika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.