Padmini Kolhapuri's son Priyanka got married and will take seven rounds with the producer's daughter | पद्मिनी कोल्हापुरीचा मुलगा प्रियांकचे ठरले लग्न, या निर्मात्याच्या मुलीसोबत घेणार सात फेरे

पद्मिनी कोल्हापुरीचा मुलगा प्रियांकचे ठरले लग्न, या निर्मात्याच्या मुलीसोबत घेणार सात फेरे

अभिनेता वरूण धवन आणि त्याच्या बालपणीची मैत्रीण नताशा दलालच्या लग्नानंतर आता आणखीन एक अभिनेता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरीने तिचा मुलगा प्रियांक शर्माचे लग्न ठरविले आहे. तो चित्रपट निर्माते करीम मोरानीची छोटी मुलगी शजा मोरानीसोबत सात फेरे घेणार आहे. या वृत्ताला करीम मोरानीने एका मुलाखतीत दुजोरा दिला आहे.

करीम मोरानीने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची मुलगी शजा प्रियांक सोबत लवकरत रजिस्टर मॅरिज करणार आहे. करीम यांनी अंदाजाने लग्न फेब्रुवारीत होणार असल्याचे सांगितले. पण कोणती तारीख सांगितली नाही.

मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लग्न ४ फेब्रुवारीत होणार आहे. कोर्टात लग्न होणार आहे आणि मग दोघांच्या कुटुंबातील मित्र आणि जवळच्या लोकांसाठी पार्टीचे आयोजन केले जाणार आहे.


पार्टी त्याच दिवशी संध्याकाळी होणार आहे. पण आतापर्यंत काहीच ठरले नाही. दोन्ही फॅमिली सध्या देश आणि जगातील परिस्थिती समजून घेत आहे. त्यामुळे त्यांना पार्टीचे आयोजन करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, लग्नासाठी आठ ते नऊ दिवस बाकी आहेत आणि बरीच तयारी बाकी आहे. कुटुंबाची इच्छा आहे की सर्व काही सुरळीत व्हावे आणि लग्नात कोणतीच कमतरता ठेवायची नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Padmini Kolhapuri's son Priyanka got married and will take seven rounds with the producer's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.