९०च्या दशकातील 'ओये ओये गर्ल' सध्या जगतेय असे आयुष्य, एकेकाळी बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 12:14 PM2021-10-23T12:14:11+5:302021-10-23T12:15:22+5:30

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यावरून गायब आहेत.

The 'Oye Oye Girl' of the 90's, a life that is now alive, was once the talk of the town due to its bold scenes. | ९०च्या दशकातील 'ओये ओये गर्ल' सध्या जगतेय असे आयुष्य, एकेकाळी बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत

९०च्या दशकातील 'ओये ओये गर्ल' सध्या जगतेय असे आयुष्य, एकेकाळी बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत

Next

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यावरून गायब आहेत. या अभिनेत्री आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे ती म्हणजे बख्तावर खान म्हणजेच 'ओये ओये गर्ल' सोनम. या अभिनेत्रीने ९०च्या दशकात बोल्ड सीन देत खळबळ माजवली होती. मात्र गेल्या ३० वर्षांपासून ती रुपेरी पडद्यावरून गायब आहे. ही अभिनेत्री सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. 

नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर बोल्ड सीन देणे खूपच आव्हानात्मक होते. त्यामुळे बोल्ड सीन द्यायला अभिनेत्री पटकन तयार होत नसत. मात्र या काळात काही अभिनेत्री अशा होत्या ज्यांनी बिनधास्त बोल्ड सीन देत सर्वांना चकित केले होते. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सोनम. अभिनेत्री सोनमने 'मिट्टी और सोना' या चित्रपटात बोल्ड सीन देत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एक दोन नव्हे तर अनेक बोल्ड सीन देत खळबळ माजवली होती. इतकेच नाही तर या चित्रपटात अभिनेत्रीने काही न्यूड सीनही दिले होते. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. 


सोनमने १९८८मध्ये 'विजय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी ती केवळ १६ वर्षांची होती. या चित्रपटात अभिनेता ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात राजेश खन्ना, हेमा मालिनी, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट होती. त्यांनतर तिला 'त्रिदेव' या चित्रपटातून एक नवीन ओळख मिळाली होती. या चित्रपटातील 'ओये ओये' या गाण्याने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. आजही तिला बॉलिवूडची 'ओये ओये गर्ल' म्हणून ओळखले जात. सोनम सध्या बॉलिवूड आणि भारतातून दूर परदेशात आपले जीवन व्यतित करत आहे.

Web Title: The 'Oye Oye Girl' of the 90's, a life that is now alive, was once the talk of the town due to its bold scenes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app