OMG! Topless photoshoot done by Kiyara Advani, use of banana leaf for cover, see photo | OMG! कियारा अडवाणीने केले टॉपलेस फोटोशूट, अंग झाकण्यासाठी केला पानाचा वापर, पहा फोटो

OMG! कियारा अडवाणीने केले टॉपलेस फोटोशूट, अंग झाकण्यासाठी केला पानाचा वापर, पहा फोटो

प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे कॅलेंडर खूप चर्चेत आले आहे. बॉलिवूडमधील कलाकार डब्बूच्या कॅलेंडरसाठी खास फोटोशूट करतात. डब्बूने २०२०चे कॅलेंडर नुकतेच लाँच केले आहे आणि यात सर्व स्टार्सचे फोटोशूट पहायला मिळते आहे. मात्र या सगळ्यात सर्वात जास्त बोल्ड फोटोशूट आहे ते भूमी पेडणेकर व कियारा आडवाणीचे. कियारा अडवाणीचा हा फोटो सोशल मीडियावर जास्त व्हायरल होतो आहे. कियाराने टॉपलेस फोटोशूट केले आहे.

कियाराच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचं तर मागील काही दिवसांपासून कियारा करियर ग्राफ उंचावत आहे. कियारा शेवटची कबीर सिंगगुड न्यूज चित्रपटात दिसली होती. या दोन्ही चित्रपटातील तिच्या भूमिकेची सगळीकडे खूप प्रशंसा झाली आहे. इतकेच नाही तर या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे.


आता नुकताच तिचा गिल्टी या वेबफिल्मचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यातदेखील कियाराचा अंदाज प्रेक्षकांना भावतो आहे. यात कियाराचा आतापर्यंत न पाहिलेला असा बोल्ड अवतार पहायला मिळतो आहे.


 ट्रेलरबद्दल सांगायचं तर ती यात नानकीची भूमिका साकारते आहे जी एक कॉलेज स्टुडंट आहे. कियाराचे तीन फ्रेंड आहेत आणि तिघे त्यांचे लाइफ एन्जॉय करत असतात. त्याचदरम्यान एक घटना घडते आणि त्यानंतर कियाराचा ग्रुप अडचणीत सापडतो. हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. 


याव्यतिरिक्त कियाराच्या चित्रपटांबद्दल सांगायचं तर भूल भुलैया व इंदु की जवानी चित्रपटातही झळकणार आहे.

Web Title: OMG! Topless photoshoot done by Kiyara Advani, use of banana leaf for cover, see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.