बऱ्याचदा पुरस्कार सोहळा किंवा लाईव्ह इव्हेंट्समध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलेब्स उप्स मोमेंटचे शिकार होताना पहायला मिळतात. सेलिब्रेटीज आपल्या बेस्ट आऊटफिटमध्ये इव्हेंट्सला येतात, पण बऱ्याचदा ड्रेस अनकम्फर्टेबल वाटत असल्यामुळे त्यांच्यासोबत घडलेल्या विचित्र गोष्टी घडताना पहायला मिळतात. अशा घटना बऱ्याचदा कॅमेऱ्यात कैद होतात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. अशा प्रसंगाला अभिनेत्री काजोलही बळी ठरली आहे.


तान्हाजी सिनेमाच्या प्रमोशनवेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी काजोल साडीत परिधान करत सोहळ्याला एंट्री घेतली. पण साडीचा पदर योग्य रितीने पिन अप झाला नव्हता आणि त्यात ब्लाऊजच डिप नेक असल्यामुळे तिचे क्लिव्हेजही दिसत होते. प्रत्येकवेळी काजोला साडीचा पदर समोर खेचत झाकण्याचा प्रयत्न करत होती. संपूर्ण वेळ ती साडीचा पदर सावरताना दिसली. यामुळे तिच्या चेह-यावर नर्व्हस भाव उमटले होते. मात्र यावेळी काजोलची कितीही प्रयत्न केले तरी Oops Moment कॅमेऱ्यात कैद झालीच. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


काजोलने पहिल्यांदाच व्यक्त केले तिच्या आयुष्यातील हे दुःख, वाचून तुमच्या डोळ्यांत येईल पाणी


तान्हाजी  चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने अजय आणि काजोल दोघांच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गुपितं सांगितली.चार वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमच्या लग्नाबाबत ऐकल्यावर अजयच्या घरातील सगळेच खूश झाले. पण माझे वडील ही गोष्ट कळल्यांतर माझ्याशी चार दिवस तरी बोलले नव्हते. मी लग्न न करता करियरवर लक्ष केंद्रित करावे असे त्यांना वाटत होते. पण मी माझा निर्णय घेतला होता.


आम्ही घरातच लग्न केले आणि लग्नानंतर आम्ही सिडनी, हवाई, लॉस एन्जेलिस येथे हनिमूनला गेलो. पण तिथे अजय आजारी पडला. त्यामुळे पुढच्या ठिकाणांवर न जाता आम्ही परतलो. कभी खुशी कभी गम या चित्रपटाच्यावेळेची एक गोष्ट मी आयुष्यात विसरू शकत नाही. या चित्रपटाच्यावेळी माझा गर्भपात झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. पण मी रुग्णालयात होते. त्यानंतर काही महिन्यांनी माझा पुन्हा एकदा गर्भपात झाला. या सगळ्याचा मला धक्का बसला होता. मी कोणत्या दुःखातून जात होती हे मी सांगू देखील शकत नाही. पण काही वर्षानंतर निसा आणि त्यानंतर युगचा जन्म झाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OMG Tanhaji Actress Kajol 'Oops' Moment in front of the paparazzi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.