OMG! South Indian superstar Vijay's house raided by Income Tax department, Rs 2 crore seized | साऊथचा सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाचा छापा, ६५ कोटी केले जप्त

साऊथचा सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाचा छापा, ६५ कोटी केले जप्त

 दाक्षिणात्य सुपरस्टार विजयची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. ही चौकशी चित्रपटाच्या आयकरशी निगडीत होती. विजय त्याच्या आगामी चित्रपट मास्टरचे तामिळनाडूतील नेयवली इथे चित्रीकरण करण्यात व्यग्र होता. आयकर विभागाचे अधिकारी कोणतीही पूर्व कल्पना न देता विजयच्या सेटवर गेले. त्यामुळे काही तासांसाठी सिनेमाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी विजयच्या फायनान्सच्या घरातून खचाखच भरलेल्या पैशाच्या बॅग जप्त केल्या आहेत.आयकर अधिकारी एजीएस सिनेमा आणि सिनेमाचे निर्माते अंबू चेलियन यांच्या संपत्तीची चौकशी करणार आहेत. एजीएस कंपनीअंतर्गत विजयच्या बिगिल या सिनेमाची निर्मिती झाली होती. या सिनेमाने ३०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. सोशल मीडियावरही या सिनेमाच्या मिळकतीची खूप चर्चा रंगली होती.


आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, विजयला या सिनेमासाठी मोठी रक्कम मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागाचे विजयवर लक्ष होते. याप्रसंगी बुधवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. ही चौकशी सिनेमाच्या आयकरशी निगडीत होती.
 बिगिल हा चित्रपट दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत सुपरहिट ठरलेला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ऐटली यांनी केले आहे. या चित्रपटात विजयसोबत नयनतारा, जॅकी श्रॉफ, योगी बाबू  हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: OMG! South Indian superstar Vijay's house raided by Income Tax department, Rs 2 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.