बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. तिने २०१० साली सलमान खानच्या दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचे वजन चक्क ९० किलो इतके होते. हे ऐकून जरा तुम्हाला धक्का बसला असेल ना... हो, हे खरे आहे. तिने चक्क ९० किलो वजन होते आणि तिने दबंग चित्रपटासाठी तब्बल ३० किलोंनी वजन घटवले.

सोनाक्षी सिन्हाने एका मुलाखतीत सांगितले की, सलमान खानच्या सांगण्यावरून तिने वजन घटविण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले. सोनाक्षीने यासाठी शाहीद कपूरच्या पर्सनल ट्रेनरची ही मदत घेतली होती. याशिवाय तिने वजन कमी करण्यासाठी हाय प्रोटीन आणि लो कार्बवाले डाएट फॉलो केले होते.

सोनाक्षीने ‘वेट लॉस’साठी खासकरून हँडस्टॅन्ड रोइंग, पिलाटे, स्किपिंग आणि बेटल रोप्सची मदत घेतली होती. याशिवाय ती स्विमिंग आणि योगा पण करत होती. तसेच ती स्वतःचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यायची.


सोनाक्षी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी दर दोन तासांनी थोडे थोडे खात होती. सोनाक्षीला खरेतर जंक फूड खूप आवडायचे आणि हेच कारण होते तिचे वजन वाढण्यामागचे.


सोनाक्षी ब्रेकफास्टमध्ये रोज ओट्स आणि अंडी खाते. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये डाळ आणि भाज्या खाते. याशिवाय ती चिकन आणि फिश पण खाते. तर, रात्रीच्या जेवणामध्ये सोनाक्षी लो कार्ब डाएट फॉलो करत होती. लेट नाईट जेवण्याऐवजी ती योग्य वेळेत डिनर घ्यायची.


सोनाक्षीच्या म्हणण्यानुसार आपण सलग काही आठवडे घरचे हेल्दी जेवत असाल तर आपण कधी कधी बाहेरचे पदार्थ खाऊ शकतो. 


सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती नुकतीच कलंक सिनेमात दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवे तितके यश मिळू शकले नाही.

या सिनेमानंतर आता तिच्याकडे मिशन मंगल, दबंग ३, भुज : द प्राईड ऑफ इंडिया चित्रपटात ती दिसणार आहे.

Web Title: OMG ...! Sonakshi Sinha, who has lost 30 kg of weight, has a Diet Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.