OMG: Siddharth Malhotra refused to work with his Excellency Alia Bhatt? | OMG : आपल्या एक्सगर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत काम करण्यास सिद्धार्थ मल्होत्राने दिला नकार ?
OMG : आपल्या एक्सगर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत काम करण्यास सिद्धार्थ मल्होत्राने दिला नकार ?
सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक दिवसांपासून एक हिट चित्रपटाच्या शोधात आहे. अय्यारी, इत्तेफाक हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे काही कमाल दाखवू शकले नाही. आता तो कॅप्टन बत्रा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ भट्ट कॅपच्या 'आशिकी 3' मध्ये दिसणार आहे. सिद्धार्थ पहिल्यांदाच भट्ट कॅपच्या चित्रपटात काम करणार आहे. याबाबत सिद्धार्थ म्हणाला की, आम्ही सगळे या चित्रपटाची खूप वाट बघतो आहे मात्र याच्यासाठी खूप वेळ लागतो आहे. मी या चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार यात सिद्धार्थच्या अपोझिट आलिया भट्ट असणार आहे. अनेक महिन्यांपूर्वी दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा होती. मात्र त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याचे कळतेय. दोघांनी करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इअरमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. अनेक वेळेला दोघांनी सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टींजमध्ये एकत्र पाहिले आहे.  मात्र आता दोघांचे रस्ते वेगळे झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दोघे आता एकत्र काम करणार नाही आहेत. त्यामुळे सिद्धार्थने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे समजते आहे. 

ASLO READ :   रणबीर कपूरची लव्ह स्टोरी सुरु होण्याआधीच संपली, या प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाला डेट करतेय आलिया भट्ट !

सध्या आलिया अयान मुखर्जीच्या ब्रम्ह्रास्त्र चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात तिच्या सोबत रणबीर कपूर दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलिया यांच्या काही तरी शिजत असल्याची चर्चा होती. मात्र चित्रपट हिट करण्यासाठी करण जोहरची ही मार्केटिंग स्ट्रॅटीजी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर या अफवांमुळे चांगलाच त्रस्त आहे. कारण रणबीर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबत लॉन्ग डिसटेन्स रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आलियासोबत नाव जोडले जाणे त्याला अजिबातच पसंत नसल्याचे समजते. तर सिद्धार्थच्या आयुष्यात ही आलियाची जागा मिस्ट्री गर्लने घेतली आहे.  त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक मिस्ट्री गर्लसोबत सिद्धार्थ दिसला होता. त्यानंतर आलिया आणि सिद्धार्थचे ब्रेकअप झाल्याचे जवळपास कंफर्म झाले होते आता तर दोघांनी एकत्र काम करण्यास ही नकार दिला आहे. Web Title: OMG: Siddharth Malhotra refused to work with his Excellency Alia Bhatt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.