OMG: The real identity of Hrithik's friend Harkesh Roshan has been hidden for 11 years! | ​OMG : ऋतिकच्या ‘या’ मित्राची खरी ओळख राकेश रोशनने ११ वर्षापासून लपवून ठेवली !
​OMG : ऋतिकच्या ‘या’ मित्राची खरी ओळख राकेश रोशनने ११ वर्षापासून लपवून ठेवली !
-Ravindra More
एखादा नवा अ‍ॅक्टर जेव्हा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतो तेव्हा त्याच्या मनात हजारो अपेक्षा असतात आणि आपल्या कठोर मेहनतीने चित्रपटाला यशस्वी बनविण्याचा प्रयत्न करीत असतो. असाच प्रयत्न बॉलिवूड अ‍ॅक्टर राकेश रोशनचा मुलगा ऋतिक रोशनने करिअरच्या सुरुवातीला २००० मध्ये ‘कहो ना प्यार हैं’ चित्रपटात केला होता, जो पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर हिट ठरला होता. मात्र त्याच्या करिअरचे काही चित्रपट विशेष कमाई करु शकले नाहीत.  

मात्र २००३ मध्ये एका चित्रपटामुळे ऋतिकच्या लाइफ ला आणि करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली. ‘कोई मिल गया’ हा तो चित्रपट असून ज्यात ऋतिकने स्पेशिअली एबल्ड मुलाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला आजदेखील कोणी विसरु शकले नाही. याच चित्रपटातील एका कॅरेक्टरने विशेष प्रसिद्धी मिळविली होती, आणि ते कॅरेक्टर म्हणजे सर्व मुलांचा लाडका ‘जादू’ होय. 

दूसऱ्या ग्रहावरून आलेल्या या एलियन आणि रोहितच्या मैत्रीमुळे चित्रपटाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर धरले. चित्रपटाच्या रिलीजनंतर जादूची एवढी क्रेज वाढली की मार्केटमध्ये जादूच्या खेळणी, सोबतच स्कूल बॅग्ज, स्टेनशरी आयटम्सवरही जादूच दिसू लागला. चित्रपट पाहिल्यानंतर आपण सर्वांनी जादू नावाच्या या कॅरेक्टरला खरा एलियन ठरवून बसलो.
  
Related image

आपण कधी विचार केला का, की राकेश रोशनने या खऱ्या एलियनला कुठून आणले असेल, जादूची भूमिका करणारा हा व्यक्ती नेमका कोण असेल? जर आपणही हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर आज आम्ही आपणास सांगणार आहोत. त्या अ‍ॅक्टरचे नाव आहे इंद्रवदन जे. पुरोहित. इंद्रवदन हा एक कलाकार होता आणि त्याने अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे.  

राकेश रोशन आणि ऋतिक रोशनकडून बऱ्याचदा जादूच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देता सुमारे ११ वर्षापर्यंत हे गुपित ठेवले. आपणास सांगताना दु:ख होते की, इंद्रवदन आता या जगात नाही आहेत. २८ सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले होते. ‘कोई मिल गया’ तील जादूचा कॉस्ट्यूम अमेरिकेतून मागविला होता, असे राकेश रोशनने एका मुलाखतीत सांगितले होते. 

Also Read : ​जर तुम्ही ‘क्रिश-४’ची प्रतीक्षा करत असाल, तर ही बातमी वाचा!Web Title: OMG: The real identity of Hrithik's friend Harkesh Roshan has been hidden for 11 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.