ठळक मुद्देया व्हिडिओत प्रियंकाने बॅकलेस हॉल्टर नेक असलेला ड्रेस घातलेला आहे. पण या ड्रेसमध्ये ती कर्म्फटेबल नाहीये का असा प्रश्न पडत आहे. कारण या व्हिडिओत तिची उप्स मुव्हमेंट कैद झाली आहे. 

बऱ्याचदा पुरस्कार सोहळा किंवा लाईव्ह इव्हेंट्समध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे सेलेब्स उप्स मुव्हमेंटचे शिकार होताना पाहायला मिळतात. सेलिब्रेटीज आपल्या बेस्ट आऊटफिटमध्ये इव्हेंट्सला येतात, पण बऱ्याचदा ड्रेस अनकम्फर्टेबल वाटत असल्यामुळे त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडताना पाहायला मिळतात. अशा घटना बऱ्याचदा कॅमेऱ्यात कैद होतात आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात.

याना गुप्ता पासून शिल्पा शेट्टी, आलिया भट आणि दीपिका पादुकोण देखील उप्स मुव्हमेंटला सामोऱ्या गेल्या आहेत. या सेलिब्रेटी त्यांच्या आऊटफीटमुळे पेचात सापडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कियारा अडवाणी उप्स मुव्हमेंटपासून स्वतःचा बचाव करताना दिसली होती आणि आता प्रियंका चोप्राची उप्स मुव्हमेंट कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या प्रियंकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आपल्याला तिचा नवरा निक जोनासला देखील पाहायला मिळत आहे. 

प्रियंका आणि निक कराओके नाईटमध्ये मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्यांच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून प्रियंका जोनस ब्रदर्स यांचे सकर हे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. या व्हिडिओत प्रियंकाने बॅकलेस हॉल्टर नेक असलेला ड्रेस घातलेला आहे. पण या ड्रेसमध्ये ती कर्म्फटेबल नाहीये का असा प्रश्न पडत आहे. कारण या व्हिडिओत तिची उप्स मुव्हमेंट कैद झाली आहे. 

येत्या 18 जुलैला प्रियंका चोप्रा तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. वाढदिवसाला उणेपुरे काही दिवस उरले असताना प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. पण या पोस्टने केवळ युजर्सलाच नाही तर मीडियालाही कन्फ्युज केले होते. मधु चोप्रा यांनी एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यात मधु चोप्रा यांच्यासोबत एक चिमुकली दिसत होती. ‘बर्थ डे आने वाला है...,’ असे या फोटोसोबत मधु यांनी लिहिले होते. साहजिकच फोटोतील चिमुकली दुसरी कुणी नसून प्रियंका असल्याचाच प्रत्येकाचा समज झाला होता. पण खुद्द प्रियंकांने कमेंट केल्यावर या पोस्टचे रहस्य उलगडले होते. प्रियंकाने या फोटोवर कमेंट करत लिहिले होते की, सिड खूप क्यूट दिसतोय... तिच्या या कमेंटनंतर मधु चोप्रासोबत असलेली ती चिमुकली नसून चिमुकला अर्थात प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ असल्याचे लोकांना कळले होते. 


Web Title: OMG ...! priyanka chopra oops moment captured on camera
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.