OMG! the kapil sharma show when movie directer did not allow to superstar shahrukh khan to drink a cold-drink on set | OMG! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!!
OMG! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!!

ठळक मुद्देमैं हू ना, ओम शांती ओम, हॅपी न्यू ईअर या फराहने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात शाहरूख लीड रोलमध्ये होता.

कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही. ‘कभी हां कभी ना’ या चित्रपटाच्या शूटींगवेळी शाहरूखला थंडगार कोल्डिंग प्यायची इच्छा व्हायची. पण ‘तू पियेगा तो सबको पिलानी पडेगी,’ असे म्हणून डायरेक्टर त्याला गप्प बसवायचे.
खुद्द डान्स कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने ‘कपिल शर्मा शो’च्या सेटवर हा किस्सा सांगितला. ‘कभी हां कभी ना’ याच चित्रपटाच्या सेटवर फराह आणि शाहरूख पहिल्यांदा भेटले होते. फराहने या सेटवरचा किस्सा शेअर केला. ‘ कभी हां कभी ना या सिनेमाच्या सेटवर माझी व शाहरूखची पहिली भेट झाली होती. त्या पहिल्या भेटीत शाहरूखला भेटून जणू आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत, असे मला वाटले. तो मला अजिबात नवखा वाटला नाही आणि त्या दिवसापासून आम्ही मित्र बनलो. याच चित्रपटाच्या सेटवर शाहरूखला कोल्ड्रिंग हवे असायचे. पण तुला एकट्याला कोल्ड्रिंग प्यायला दिले तर बाकींनाही ते द्यावे लागेल, असे सांगून डायरेक्टर त्याला नकार द्यायचा,’ असे फराहने सांगितले. तेव्हा इतके गरीब प्रॉडक्शन होते,असे म्हणून ती जोरजोरात हसू लागली.


शाहरूख व फराह या दोघांनी एकत्र असे अनेक चित्रपट केलेत. शाहरूखच्या अनेक चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफीही फराहने केली. मैं हू ना, ओम शांती ओम, हॅपी न्यू ईअर या फराहने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात शाहरूख लीड रोलमध्ये होता.

Web Title: OMG! the kapil sharma show when movie directer did not allow to superstar shahrukh khan to drink a cold-drink on set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.