ठळक मुद्देराहुलने जुनून, गुमराह, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो काही वर्षांपूर्वी बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकला होता. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याला मिळाले होते. 

राहुल रॉय हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. राहुल रॉय हा काही वर्षांपूर्वी तरुणींच्या दिल की धडकन बनला होता. त्याला चांगलीच लोकप्रियता होती. नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्या काळात त्याची गणना केली जात असे. पण कालांतराने तिची लोकप्रियता कमी होत गेली आणि लोकांना या अभिनेत्याचा विसर पडला. पण आता करिनामुळे राहुल रॉय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

करिना कपूरने डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात नुकतीच याविषयी कबुली दिली. डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात करिना परीक्षकाची भूमिका बजावत असून तिचे सगळ्यात पहिले क्रश कोणावर होते असे या कार्यक्रमात विचारण्यात आले. त्यावर या कार्यक्रमात तिने सांगितले की, तिचे पहिले क्रश हे दुसरे कोणीही नसून अभिनेता राहुल रॉय आहे. केवळ त्याच्यासाठी तिने आशिकी हा चित्रपट आठ वेळा पाहिला होता. करिनाने केलेल्या या वक्तव्यानंतर राहुल रॉयने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहित करिनाच्या या कमेंटनंतर मला काय बोलायचे हेच कळत नाहीये असे म्हटले आहे.

राहुल रॉय आज चित्रपटसृष्टीपासून दूर असला तरी एकेकाळी तो सुपरस्टार होता. आशिकी हा राहुलचा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही.

त्याने जुनून, गुमराह, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो काही वर्षांपूर्वी बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकला होता. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याला मिळाले होते. 

राहुल काही वर्षांपूर्वी त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. त्याचे लग्न राजलक्ष्मी खानविलकर या मॉडेलसोबत झाले होते. पण त्या दोघांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तो साधना सिंग या मॉडेलला डेट करत असल्याचे म्हटले जाते.  


Web Title: OMG has changed so much with Ashiqi fame Rahul Roy, it is also difficult to identify
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.