बॉलिवूडची क्युट गर्ल म्हणजेच अभिनेत्री सारा अली खान सध्या आगामी चित्रपट लव आज कलमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात सारासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने अभिनयासोबत तिच्या ग्लॅमरस अदांनी रसिकांना भुरळ पाडली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत असते. यावेळी साराने इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल.

सारा अली खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सारा खूप जाडी दिसते आहे. पहिल्यांदा व्हिडिओ पाहताना तुम्हाला ही सारा आहे असा विश्वासच बसणार नाही. व्हिडिओमध्ये सारा अली खान मस्ती करताना दिसत आहे.


साराचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ती फ्लाइटमध्ये तिच्या मैत्रिणींचा व्हिडिओ बनवत असते आणि बॅकग्राउंडला गाणं वाजत असतं की सर जो तेरा चकराए या दिल डुबा जाए. सारा अली खानचा अंदाज पाहून तुम्ही चकीत व्हाल. सारा अली खानने व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, प्रेझेंटिंग सारा का सारा सारा.


सारा अली खानने यापूर्वीदेखील एक व्हिडिओ समोर समोर आला होता.ज्यात सारा खूप जाडी दिसत होती. त्यात सारा आशिकी २चं गाणं गाताना दिसत होती.

आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे. 

Web Title: OMG! After watching Sara Ali Khan video, you will say, 'Arara rara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.