Oh wow!Shilpa Shetty dances to 'Sauda Khara Khara' song with mother in law on her Birthday | अरे व्वा भन्नाटच ! शिल्पा शेट्टीने सासूबाईसह धरला ठेका, पाहा व्हिडीओ

अरे व्वा भन्नाटच ! शिल्पा शेट्टीने सासूबाईसह धरला ठेका, पाहा व्हिडीओ

कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र काही जण याला अपवाद असतात. सारं काही सांभाळून हे कलाकार आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात, शिवाय इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. या काळात कलाकार आपले छंद आणि आवड जपतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. शिल्पाला योगाची आवड आहे हे जगाला माहिती आहे. लॉकडाऊनमध्ये तिने आणखी एका गोष्टीचा छंद जोपासला. नेहमी तिचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांचे मनोरंजन केले. 


सध्या शिल्पा तिच्या कुटुंबियांसह क्वॉलिटी टाईम मस्त एन्जॉय करताना दिसते. नेहमी नवरा बहिण आणि मुलासह व्हिडीओ करणारी शिल्पाने यावेळी तिच्या सासूबाईंनाच ठेका धरायला भाग पाडले. सासूबाईंनीही सूनेसह ठेका धरत फुल धम्माल केली. विशेष म्हणजे सासूबाईंचा त्या दिवशी वाढदिवसही होता. कुठेही बाहेर न पडता. घरातल्या घरातच सारे कुटंब मजा मस्ती करत वाढदिवस साजरा करताना दिसले. खुद्द शिल्पानेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने खास कॅप्शनही दिले आहे. व्हिडीओ शेअर करत तिने म्हटले आहे की, ‘जगातील सर्वात बेस्ट सासूबाई.त्यांचा आज वाढदिवस. तुम्ही आमच्यासाठी एक रॉकस्टार आहात'. 


१५ फेब्रुवारी रोजी शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली. तिने सरोगसीद्वारे एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचं नाव ‘समिषा’ आहे. शिल्पाने तिच्यासोबतचा एक छान फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिच्यासोबत मुलगा वियानदेखील दिसून येत आहे. ‘तीन महिने झाले अभिनंदन. माझी राजकुमारी समिषा’, असं कॅप्शन शिल्पाने या फोटोला दिले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Oh wow!Shilpa Shetty dances to 'Sauda Khara Khara' song with mother in law on her Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.