अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत विक्रम बत्रा यांचा बायोपिक 'शेरशाह'चे चित्रीकरण करत आहे. आता कियाराच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'इंदु की जवानी'. या चित्रपटात ती गाजियाबादची मुलगी इंदु गुप्ताच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. 

'इंदु की जवानी' चित्रपटाची कथा इंदु गुप्तावर आधारीत असून ती डेटिंग अॅपवर लेफ्ट व राइट स्वाईप करते आणि त्यामुळे ती एका अडचणीत सापडते, यावर आधारीत आहे. या चित्रपटातून बंगाली लेखक व फिल्ममेकर आबिर सेनगुप्ता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. हा सिनेमा सप्टेंबरमध्ये फ्लोअरवर जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल आडवाणी, निरंजन अयंगर व रायन स्टीफेन करत आहेत.

निर्माते निखिल आडवाणी यांनी सांगितले की, 'काही दिवसांपूर्वी माझी मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आली आणि तिने आम्ही निर्मिती केलेल्या सर्व चित्रपटांचे पोस्टर्स पाहिले. तिने विचारले की या पोस्टर्सवर फक्त पुरूषच आहेत का, कोणी महिला नाही आहे का? त्याच वेळी मी इंदु की जवानीची कथा ऐकली. ही कथा घेऊन निरंजन व रायन आले होते. ही कथा ऐकल्यानंतर ती मला खूपच भावली. ही कथा एका महिलेच्या अवतीभवती फिरते.'

कियाराचा हा पहिला चित्रपट आहे जी महिला केंद्रीत आहे. याबाबत कियारा सांगते की,' इंदु तेजस्वी, प्रेमळ व विचित्र आहे. माझ्यासाठी हे सगळे नवीन आहे. यासाठी मी वर्कशॉप अटेंड करणार आहे. मी या चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी खूप उत्सुक आहे.'


कियारा पुढे म्हणाली की,'या चित्रपटाची कथा आजच्या काळावर आधारीत आहे. माझे पात्र खूपच इंटरेस्टिंग आहे. '


तू कधी डेटिंग अॅप वापरले का, असे विचारल्यावर कियारा म्हणाली की, नाही. 'पण माझ्या मित्र मैत्रिणींनी वापरलेले आहे. याचे मी अनेक किस्से व अनुभव ऐकले आहेत.'


Web Title: Oh wow ...! Kiara Advani got lottery, She got big movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.