कट्टरपंथीयांवर भडकल्या अभिनेत्री नुसरत जहां, म्हणाल्या - लव्ह आणि जिहाद एकत्र होऊ शकत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 04:27 PM2020-11-24T16:27:43+5:302020-11-24T16:32:30+5:30

लव्ह जिहादबाबत खासदार नुसरत म्हणाल्या की, लव्ह आणि जिहाद दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही एकत्र असू शकत नाहीत.

Nusrat Jahan slams religious fundamentalists says love and jihad do not go hand in hand | कट्टरपंथीयांवर भडकल्या अभिनेत्री नुसरत जहां, म्हणाल्या - लव्ह आणि जिहाद एकत्र होऊ शकत नाही!

कट्टरपंथीयांवर भडकल्या अभिनेत्री नुसरत जहां, म्हणाल्या - लव्ह आणि जिहाद एकत्र होऊ शकत नाही!

googlenewsNext

(Image Credit : thestatesman.com)

बांग्ला सिनेमांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसचे लोकसभा सांसद नुसरत जहांने कथित लव्ह जिहादवर राजकारण करणाऱ्या धार्मिक कंटरपंथीयांवर जोरदार टीका केली आहे. नुसरत जहां म्हणाली की, आगामी पश्चिम बंगाल विधानसभा विधानसभा निवडणुकांसाठी धर्माला राजकारणाचं माध्यम बनवलं जात आहे. याआधीही नुसरत या धार्मिक कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर होत्या. कारण त्यांनी दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत लग्न केलं.

लव्ह जिहादबाबत खासदार नुसरत म्हणाल्या की, लव्ह आणि जिहाद दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही एकत्र असू शकत नाहीत. त्या म्हणाल्या की, कुणाला कुणासोबत रहायचंय हा धार्मिक नाही तर पूर्णपणे खाजगी मुद्दा आहे. नुसरत म्हणाल्या की, 'लव्ह एक फार खाजगी बाब आहे. लव्ह आणि जिहाद एकत्र चालू शकत नाही. निवडणुकांआधी लोक बरोबर हा मुद्दा आणतात. ही एक खाजगी बाब आहे की, कुणाला कुणासोबत रहायचं आहे. प्रेम करा आणि एकमेकांशी प्रेम करा. धर्माला राजकारणचं माध्यम बनवू नका'.

दरम्यान, नुसरत जहां यांनी बिझनेसमन निखील जैनसोबत लग्न केलंय. त्यानंतर भांगेत कुंकू आणि मंगळसूत्र घातल्याने तसेच दुर्गा पूजेत भाग घेतल्याने मुस्लिम कट्टरपंथीयांनी नुसरतवर टीका केली होती. नुसरत यांनी त्यावेळीही मुस्लिम कंट्टरपंथीयांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. काही दिवसांपूर्वीच दुर्गा देवीच्या गेटअपमध्ये फोटोशूट केल्याने नुसरत यांच्यावर कट्टरपंथीयांनी निशाणा साधला होता. इतकेच काय तर त्यांनी जीवे मारण्याचीही धमकी दिली होती.
 

Web Title: Nusrat Jahan slams religious fundamentalists says love and jihad do not go hand in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.