शाहरूखच्या या बंगल्यात तुम्हालाही मिळू शकते मुक्कामाची संधी, गौरी खानने रिडिझाईन केले घर

By रूपाली मुधोळकर | Published: November 18, 2020 03:26 PM2020-11-18T15:26:55+5:302020-11-18T15:29:43+5:30

शाहरूख-गौरीच्या या अलिशान घराचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

now you can stay for 2 nights in shahrukh khan and gauri delhi bungalow | शाहरूखच्या या बंगल्यात तुम्हालाही मिळू शकते मुक्कामाची संधी, गौरी खानने रिडिझाईन केले घर

शाहरूखच्या या बंगल्यात तुम्हालाही मिळू शकते मुक्कामाची संधी, गौरी खानने रिडिझाईन केले घर

googlenewsNext

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि गौरी खानच्या घरात   मुक्कामाला जाणे, कोणाला आवडणार नाही. शाहरूखचे चाहते तर यासाठी एका पायावर तयार होतील. तर आता तुम्हा ही संधी मिळू शकते. होय, नव्या वर्षात व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर शाहरूखच्या दिल्लीतील बंगल्यात 2 रात्री घालवण्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख व गौरीने एका घर मिळवून देणा-या संस्थेच्या सहकार्याने एका स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावी लागणार. ती म्हणजे, ‘ओपन आर्म वेलकम’चा अर्थ लिहून 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवावा लागेल. जो चाहता सर्वाधिक सुंदर उत्तर देईल, त्याला शाहरूख व गौरीच्या दिल्लीच्या अलिशान बंगल्यात 13 व 14 फेब्रुवारी 2020 ला मुक्काम करण्याची संधी मिळेल.

गौरीने केले रिडिझाईन
गौरी एक इंटिरिअर डिझाईनर आहे. दिल्लीचा बंगला गौरीने नुकताच रिडिझाईन केला आहे.  याचे फोटो व व्हिडीओ शाहरूख व गौरीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘दिल्लीतील या घरात आमच्या खूप सा-या आठवणी आहेत. दिल्ली शहराचे आमच्या मनात एक खास स्थान आहे. गौरीने दिल्लीतील हे घर पुन्हा डिझाईन केले आहे. जुन्या स्मृती व प्रेमाने हे घर नव्याने सजवले आहे. या घरात तुम्ही आमचे पाहुणे बनू राहू शकता...,’ असे या बंगल्याचे फोटो शेअर करताना शाहरूखने लिहिले आहे. गौरीने या बंगल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात घरातील प्रत्येक खोलीपासून ते ड्रॉर्इंग रूमपर्यंतची झलक दिसतेय. आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

शाहरूख खानने कशी खर्च केली होती त्याची 50 रूपयांची पहिली कमाई, आता इतक्या कोटींचा मालक  

Web Title: now you can stay for 2 nights in shahrukh khan and gauri delhi bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.