Now mumbai police is going to close the file of sushant suicide case | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची फाईल मुंबई पोलीस बंद करणार? समोर आले हैराण करणारे कारण

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची फाईल मुंबई पोलीस बंद करणार? समोर आले हैराण करणारे कारण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने जगाचा निरोप घेऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे. मुंबई पोलिसांच्या हातात या प्रकरणी अजून काहीही लागलेले नाही. याप्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवल्यानंतरही अजून काही ठोस पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. मुंबई पोलिस सातत्याने तपास करत आहेत, मात्र सोशल मीडियावर सीबीआय चौकशीची मागणी जोर धरत आहे.राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार मुंबई पोलीस या प्रकरणाची फाईल बंद करणार असल्याची माहिती आहे. रिपोर्टनुसार, या सुशांत आत्महत्याप्रकरणाचा तपास करणार्‍या मुंबई पोलिसांनी काही दिवसांत ही केस फाईल बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस याप्रकरणी आपल्या अंतिम अहवालाकडे वाटचाल करत आहेत.

सूत्रांही आत्महत्या नसून खून असल्याचे कोणताच पुरावे मुंबई पोलिसांना मिळालेले नाही. पुरावा नसल्यामुळे आणि तपासात जे उघड झाले आहे त्या आधारे पोलीस त्यास आत्महत्या मानत आहेत. याच कारणामुळे मुंबई पोलिस फाईल बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहेत. चौकशीदरम्यान सुशांत आर्थिक संकटात सापडला होता आणि तो खूप अस्वस्थ होता, हे स्पष्ट झाले आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Now mumbai police is going to close the file of sushant suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.