ठळक मुद्देया सिनेमातील शिवगामी देवी  आणि देवसेनाच्या भूमिकेसाठीही मेकर्सनी दुस-याच कलाकारांच्या नावाचा विचार केला होता.

साऊथचे दिग्गज दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली- द बिगिनींग’ या सिनेमाला नुकतीच 5 वर्षे  पूर्ण झालीत. या सिनेमाने इतिहास रचला. आजही टीव्ही हा सिनेमा लागला की, लोक जागचे हलत नाहीत. या चित्रपटातील प्रभाससह सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. बाहुबली प्रभासची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा कटप्पाची भूमिका साकारणारा साऊथ अभिनेता सत्यराजचीही चर्चा झाली. पण तुम्हाला ठाऊक आहे का की, सत्यराजआधी कटप्पाच्या या भूमिकेसाठी बॉलिवूडचा एक अभिनेता पहिली पसंत होता.

होय, कटप्पाच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम बॉलिवूड स्टार संजय दत्तची निवड करण्यात आली होती. मग ही भूमिका संजय दत्तने का नाकारली? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर त्याने नाकारली नाही. त्यामागे एक वेगळेच कारण होते.  दिग्दर्शक राजमौलीचे वडिल आणि ‘बाहुबली’चे लेखक विजयेन्द्र प्रसाद यांनी अलीकडे एका मुलाखतीत या कारणाचा खुलासा केला.

त्यांनी सांगितले की, कटप्पाच्या भूमिकेसाठी संजय दत्त आमची पहिली पसंत होता. पण तेव्हा तो तुरुंगात होता. त्यामुळे तेव्हा आम्ही त्याला कास्ट करू शकत नव्हता. यानंतर आमच्या टीमपुढे सत्यराजचा पर्याय होता. अखेर सत्यराजचे नाव या भूमिकेसाठी फायनल झाले. सत्यराजने ही भूमिका अशी काही जिवंत केली की, इतिहास रचला गेला.

या सिनेमातील शिवगामी देवी  आणि देवसेनाच्या भूमिकेसाठीही मेकर्सनी दुस-याच कलाकारांच्या नावाचा विचार केला होता. शिवगामीच्या भूमिकेसाठी आधी श्रीदेवी मेकर्सची पहिली पसंत होती. तर देवसेनाच्या भूमिकेसाठी मेकर्सनी नयनताराचे नाव फायनल कले होते. पण या दोघींनीही नकार दिला. यानंतर शिवगामी देवीची भूमिका राम्या कृष्णनला दिली गेली आणि देवसेनाच्या भूमिकेसाठी अनुष्का शेट्टीची निवड झाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: not sathyaraj but sanjau dutt from bollywood was the first choice of prabhass baahubali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.