जेनेलियाच नाही तर,विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड,धाकट्या सूनबाईतर प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांची कन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:57 PM2021-05-12T15:57:41+5:302021-05-12T16:11:47+5:30

देशमुख कुटुंबात केवळ जेनिलायाचे फिल्मी बॅकग्राऊंड असल्याचे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र जेनियाप्रमाणेच त्यांच्या दोन सुनांचे देखील फिल्मी बॅकग्राऊण्ड आहे. 

Not only Genelia D'Souza, Vilasrao Deshmukh's families all 3 daughter in laws are from filmy background, Youngest of them is duaghter of known producer Vashu Bhagnani | जेनेलियाच नाही तर,विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड,धाकट्या सूनबाईतर प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांची कन्या

जेनेलियाच नाही तर,विलासरावांच्या तिन्ही सुनांचे फिल्मी बॅकग्राऊण्ड,धाकट्या सूनबाईतर प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांची कन्या

Next

रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसोजा बॉलिवूडमधील सर्वाधिक क्युट जोडी मानली जाते. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश आणि जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्यांचे कारण म्हणजे, जेनेलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू.

 

त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला. लग्नानंतर जेनेलिया डिसोजाची जेनेलिया देशमुख झाली. या कपलला दोन मुलं आहेत. राहिल आणि रियान अशी त्यांच नावं आहेत. रितेश आणि जेनिलाया दोघेही नेहमी सोशल मीडियावर एकत्र फोटो व मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात.

रितेशचे वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातच्या राजकारणाचे एक मोठे नाव होते. विलासराव यांच्या तिन्ही सुपुत्रांनी आज आपापल्या क्षेत्रात मोठं नाव कमवत आहेत. अमित देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख या देशमुख भावंडाविषयी सगळ्यांनात माहिती आहे.अमित देशमुख यांच्याकडे महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री या पदाचा पदभार आहे. धीरज देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत पहिल्याच लढ्यात आमदार पद मिळवले आहे. तर रितेश देशमुखनेही अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. देशमुख कुटुंबात केवळ जेनिलायाचे फिल्मी बॅकग्राऊंड असल्याचे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र जेनियाप्रमाणेच त्यांच्या दोन सुनांचे देखील फिल्मी बॅकग्राऊण्ड आहे. 

अमित देशमुख यांची पत्नी अदिती प्रताप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २००८ साली अदिती व अमित देशमुख यांचा विवाह झाला. दोघांचेही अरेंज मॅरेज आहे.या दोघांना अवीर आणि अवान अशी दोन मुले आहेत. तर धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिखा देशमुख निर्माती आहे.

२०१२ मध्ये धीरज देशमुख हे दीपशिखा भगनानी यांच्याशी विवाहबद्ध झाले. या दोघांनाही दोन मुलं आहेत. मुलाचे नाव वंश तर मुलीचे नाव दीवियान असे आहे. दीपशिखा या चित्रपट निर्माते वासू भगनानी यांची कन्या आणि अभिनेता जॅकी भगनानी याची बहीण आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Not only Genelia D'Souza, Vilasrao Deshmukh's families all 3 daughter in laws are from filmy background, Youngest of them is duaghter of known producer Vashu Bhagnani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app