चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला हा व्हायरस, संपूर्ण जगात पसरला. इटली, स्पेन या देशांमध्ये तर चीनपेक्षा अधिक बळी गेले आहेत. भारताने वेळीच सावध होत लॉकडाऊनचं पाऊल उचललं आहे. म्हणून सध्या देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करत आहे. भारत सरकारने परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना देखील भारतामध्ये आणून मोलाची कामगिरी बजावली आहे. संपूर्ण देश एक होऊन यावेळी कोरोनाशी लढा देत आहे.

अर्जुन कपूर सोशल मीडियावर सतत त्याची गर्लफ्रेंड मलायकामुळे सर्वात जास्त चर्चेत असतो. जिथे मलायका तिथे अर्जुन असे समीकरणच आता बनत चालले आहे. सध्या भारतात २१ दिवसांचा लॉक डाऊन पाळला जात आहे, सामान्यापासून ते  सेलिब्रेटीपर्यंत सारेच सध्या आपापल्या घरात बंदिस्त आहेत. अशात काही किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवत वेळ घालवत आहेतर काही वर्कआऊट करण्यात वेळ घालवत आहे. लॉक डाऊनमुळे दुरावलेली नाती पुन्हा एकत्र येत असल्याचे पाहयाल मिळत आहे. असाच एक खास किस्सा अर्जुन कपूरने देखील शेअर केला आहे. 

इंस्टाग्रामवर बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे, या फोटोला त्याने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे.  शेअर केलेल्या फोटोत बहीण अंशुला कपूर त्याच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. अर्जुन फोटो शेअर करत म्हटले की,  1990 पासून आम्ही आयसोलेट आहोत.अर्जुनने सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईन अँड चिल, पार्टनर इन क्राइम या हॅशटॅगचा वापर केला आहे. 

Web Title: Not Malaika Arora Arjun Kapoor's shares Memorable Photos With This Specail Person During Lock Down-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.