ठळक मुद्देअभिनेत्री मनिषा कोईरा तर एकेकाळी चेन स्मोकर होती. तिचे सिगारेट पितानाचे अनेक फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण कॅन्सर झाल्यानंतर मनिषाने स्मोकिंग पूर्णपणे सोडले.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा सोशल मीडियावर नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत प्रियंका तिची आई मधु चोप्रा आणि पती निक जोनास यांच्यासोबत सिगरेटचे झुरके मारताना दिसतेय. प्रियंकाच्या हातात सिगारेट आहे तर तिच्या आईच्या हातात सिगर आहे. या फोटोमुळे प्रियंकाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आलं आहे. दिवाळीत फटाके न उडवण्याचे आणि अस्थमा असल्याचे सांगणारी प्रियंका आई आणि पतीसोबत सिगरेटचे झुरके घेत आहे, हे पाहिल्यावर अनेकांनी तिला ट्रोल केले. सिगरेट ओढताना तुला अस्थमा आठवला नाही का? असे एका युजरने तिला सुनावले. तर अनेकांनी यापुढे आम्हाला शिकवू नकोस, असे तिला सुनावले.

केवळ प्रियंकाच नव्हे तर याआधी देखील अनेक अभिनेत्रींचे सिगरेट पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रईस या चित्रपटात झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि रणबीर कपूर यांचा न्यूयॉर्कमधील एका रस्त्यावर स्मोक करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. 

सुश्मिता सेन ही मिस युनिव्हर्स असून तिच्या सौंदर्याची, तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा सुरू असते. सुश्मिताचा सिगरेट ओढतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमुळे तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. 

द कपिल शर्मा शो मुळे सुमोना चक्रवर्तीला चांगलीच लोकप्रियताना मिळाली. प्रेक्षकांच्या याच लाडक्या सुमोनाचा सिगरेट पितानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

अभिनेत्री मनिषा कोईरा तर एकेकाळी चेन स्मोकर होती. तिचे सिगरेट पितानाचे अनेक फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण कॅन्सर झाल्यानंतर मनिषाने स्मोकिंग पूर्णपणे सोडले.

बिदाई या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सारा खानचा स्मोकिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

महाभारत या मालिकेतील द्रौपदीच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रूपा गांगुलीला अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करताना पाहाण्यात आलेले आहे. 

अभिनेत्री डिम्पल कपाडिया आणि सनी देओल यांना काही महिन्यांपूर्वी परदेशात एकत्र पाहाण्यात आले होते. त्यावेळी व्हायरल झालेल्या फोटोत डिम्पल सिगरेट पित असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Not even Priyanka chopra but this bollywood actress also caught in camera while smoking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.