वयाची पन्नाशी गाठलेली पूजा बेदी लग्नबंधनात अडकणार असल्याचे ऐकताच अनेकांना थोडा धक्काच बसला असणारच. पण ही चंदेरी दुनिया येथे अशीच नाती बनतात आणि दुरावतात ही. पूजा बेदीचे हे दुसरे लग्न असणार आहे. मानेक कॉन्ट्रॅक्टरसह तिचा साखरपुडाही झाला आहे. लग्नाआधीच हे दोघे अनेक ठिकाणी फिरताना दिसतात. सगळी बंधनं तोडत हे कपल त्यांचा क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळतात. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतात.या फोटोंची बरीच चर्चा होते. या फोटोलाही बरेच कमेंटस आणि लाईक्स मिळत असतात. सतत हे दोघे त्यांचे बोल्ड आणि रोमांटीक फोटो शेअर करत असल्याचे पाहायला मिळते.दोघांमध्ये चांगली केमिस्ट्रीही पाहायला मिळते.


पूजाने 8 सिनेमा केले आहेत. पण ते सगळे फ्लॉप ठरले आहेत. पूजाही ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदीची मुलगी आहे. 'जो जीता वही सिंकदर' या सिनेमामुळे तिला आजही ओळखले जाते. पूजाच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा ती वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. तिचे अफेअर्सची तर लिस्टही तशी मोठीच आहे. अनेकांशी तिचे नाव जोडले गेले आहे. 


1994 मध्ये तिने फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले.पण लग्नाच्या 12 वर्षानंतरच दोघांचा घटस्फोटही झाला. या दोघांना उमर आणि आलिया दोन मुलं आहेत. त्यात आलियाही तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर सा-यांची वाहवा मिळवत असते. तशीच इतर स्टारकिडस प्रमाणे आलिया फर्निचरवालाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून सैफ अली खानच्या सिनेमात तिची वर्णी लागल्याचे समजते आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Not Deepika & Ranveer, Pooja bedi And Maneck Contractor Are Most Sexy couple on the internet today,Know The Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.