बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी स्टारकास्टमुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी पहिल्यांदा प्रियंका चोप्राचं नाव समोर आलं होतं. मात्र आता या चित्रपटासाठी आलिया भटला फायनल करण्यात आलं आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी भन्साळीची या अभिनेत्री पहिली पसंती होती. 


टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात गंगूबाईच्या भूमिकेसाठी सर्वात आधी राणी मुखर्जीला घ्यायचे ठरले होते. मात्र राणी मुखर्जीसोबत बात बनली नाही.

त्यानंतर प्रियंका चोप्राच्या नावावर विचार करण्यात आला. परंतु प्रियंकाच्या बिझी शेड्युलमुळे तिचं नावदेखील कन्फर्म होऊ शकलं नाही.


काही दिवसांपूर्वी सलमान खानने इंशाअल्लाह सोडल्यामुळे चित्रपटाचे काम थांबलं आणि लांबणीवर गेले. इंशाअल्लाहसाठी तर आलिया भटच्या तारखा देखील निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यात मग संजय लीला भन्साळीने बऱ्याच कालावधीपासून लटकलेला चित्रपट गंगूबाई आलिया भटसोबत बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीदेखील रामलीला व बाजीराव मस्तानी हे सिनेमे बराच काळ अडकले होते. मात्र नंतर हे चित्रपट पूर्ण झाले.


२०१८ साली प्रदर्शित झालेल्या पद्मावत चित्रपटानंतर संजय लीला भन्साळीचा आगामी चित्रपट गंगूबाई असणार आहे. हा चित्रपट हुसैन जैदी यांची कादंबरी माफिया क्वीन्स ऑफ मुंबईवर आधारीत आहे.

या चित्रपटात एका अशा मुलीची कथा रेखाटली जाणार आहे जिला कमी वयात देहविक्री व्यवसायात जबरदस्ती ढकलले जाते आणि नंतर तिच मुलगी इतिहासातील सर्वात पावरफुल महिला बनते.

Web Title: Not Alia Bhatt, Rani Mukerji Was First Choice For Sanjay Leela Bhansali's Gangubai Kathiawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.