Nora Fatehi shared the video with Teresa, which went viral on social media. | 'त्या' वादग्रस्त व्हिडीओनंतर नोरा फतेहीने शेअर केला टेरेंसासोबतचा व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल

'त्या' वादग्रस्त व्हिडीओनंतर नोरा फतेहीने शेअर केला टेरेंसासोबतचा व्हिडीओ, सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस यांचा एक व्हिडीओ अलीकडेच प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर टेरेंस सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. या व्हिडीओत कथितरित्या टेरेंस नोराला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करताना दिसत होता. या वादग्रस्त व्हिडीओवर नंतर टेरेंस आणि नोराने आपली  प्रतिक्रियाही दिली होती. 

 

यानंतर आता नोरा फतेहीने टेरेंस सोबतचा 'इंडियाज बेस्ट डान्सर’च्या सेटवरचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत टेरेंस आणि नोरा डान्स करताना दिसतायेत. त्यानंतर गीता कपूरही त्यांना डान्समध्ये ज्वॉईन करताना दिसतेय. नोराने नुकताच टाकलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. नारा या शोमध्ये मलायका अरोराला कोरोना झाल्यामुळे तिच्या जागी काही  एपिसोड जज म्हणून आली होती.

नोराचे शोमध्ये परत येण्याचे संकेत
मलायका अरोरा परत आल्यावर 'इंडियाज बेस्ट डान्सर'ची गेस्ट जज नोरा फतेहीला शो सोडावा लागेल. यावरून नोरा फतेहीचे फॅन्स नाराज झाले होते. पण तिच्या फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी आहे. नोराशी संबंधित एक आनंदाची बातमी स्वत: शोच्या निर्मात्यांनी दिलीये. निर्मात्यांनी सांगितले की, आम्हाला नोरा असणं अशाप्रकारे अचानक संपवायचं नाहीये. आमची इच्छा आहे की, नोराचा निरोप समारंभ चांगल्याप्रकारे व्हावा'.त्यांनी सांगितले की, 'नोराचं फेअरवेल गिफ्ट म्हणून या आठवड्यात स्पर्धक तिच्या गाण्यांवर परफॉर्म करतील. ते म्हणाले की, 'नोराची आमच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. आम्ही परिस्थितीनुसार तिला संधी दिली आणि आम्ही याचा फायदा करून घेतला. ती एक चांगली महिला आणि इंडस्ट्रीतील शानदार डान्सर्सपैकी एक आहे'.अशात त्यांनी इशारा केला की, नोरा शो संपण्यापूर्वी स्टेजवर पुन्हा येऊ शकते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nora Fatehi shared the video with Teresa, which went viral on social media.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.