Nora fatehi bigg boss is the turning point of he career | कधी वेटर तर कधी लॉटरी विकायची अभिनेत्री नोरा फतेही, 'Bigg Boss' मध्ये एंट्री करताच बदलले नशीब

कधी वेटर तर कधी लॉटरी विकायची अभिनेत्री नोरा फतेही, 'Bigg Boss' मध्ये एंट्री करताच बदलले नशीब

शोमध्ये नोरा मलायका अरोराच्या जागी जज म्हणून आली आहे. आधी नोराला दोन एपिसोड जज करण्यासाठी साईन केले गेले होते. मात्र मलायकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिचा करार आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला. 'बिग बॉस 9' मध्ये सहभागी झाल्यानंतर नोराचे नशीब बदलले. पण नोराचा इथेवर पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. 

बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नोराला खूप संघर्ष करावा लागला. नोरा फतेहीने कधी वेटरचे काम केले आहे तर कधी पोट भरण्यासाठी नोरावर लॉटरी विकण्याची वेळही आली होती. एका मुलाखती दरम्यान नोरा म्हणाली होती की,  स्ट्रगलिंगच्या दिवसांत ती PG म्हणून राहायची. त्यावेळी तिला हिंदी बोलता येत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिच्यावर अनेक वेळा वाईट कमेंट्स केल्या जायच्या. स्ट्रगलिंगच्या दिवसांत तिचा सामना एका कास्टिंग एजेंटशी झाला होता. त्याने नोराच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अश्लिल कमेंट्स केल्या. नोराची ऑडिशन दरम्यान हिंदी न येत असल्यामुळे खिल्ली उडवली जायची. अनेक वेळा ऑडिशन दिल्यानंतर ती  घरी जाऊन रडायची.      

अभिनेत्री नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने तिच्या डान्स स्टाइलमुळे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.तिने आतापर्यंत तिची 'दिलबर', 'कमरिया', 'साकी साकी', 'एक तो कम जिंदगी' आणि 'गर्मी सॉन्ग' ही गाणी फारच गाजली. अजूनही तिची ही गाणी खासकरून तिच्या अफलातून डान्ससाठी पाहिली जातात. सिनेमात काम करण्याबाबत सांगायचं तर नोरा अजय देवगनसोबत 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे.

 

नोरा फतेहीचा सलमानच्या गाण्यावरील जबरदस्त बेली डान्स पाहून फॅन्सची बोलती बंद, व्हिडीओ व्हायरल

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणणार्‍या ट्रोलर्सला टेरेंसने ऐकवली साधूची कथा; नोरा म्हणाली, थँक्स

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nora fatehi bigg boss is the turning point of he career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.